• May 15, 2023
  • No Comment

कोरेगाव पार्कसारख्या उच्चभ्रू भागातील स्पा सेंटरवर कारवाई पाच महिलांची सुटका

कोरेगाव पार्कसारख्या उच्चभ्रू भागातील स्पा सेंटरवर कारवाई पाच महिलांची सुटका

    पुणे : पुणे शहर आणि परिसरात वेश्या व्यवसाय अनेक ठिकाणी सुरु आहे. विशेषत: स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी पंचतारांकीत हॉटेलमधील सेक्स रॅकेटवर कारवाई केली. त्यानंतर पुणे पोलिसांनी कोरेगाव पार्कसारख्या उच्चभ्रू भागातील स्पा सेंटरवर कारवाई केली. तीन स्पा सेंटरवर कारवाई करत पाच महिलांची सुटका केली. त्यात तीन विदेशी महिला आहे. या प्रकरणात एका दलालावर कारवाई झाली आहे.


    पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षेच्या विभागाने केलेल्या कारवाईत पाच पीडित मुलींची सुटका करण्यात आली. पिडीत महिलांमध्ये ३ परदेशी महिला तर २ भारतीय महिला आहेत. या प्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाकडून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अजून काही जणांचा शोध सुरु आहे.

    महिन्याभरात पाचवी कारवाई

    पुणे पोलिसांनी स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाविरोधात जोरदार कारवाई सुरु केली आहे. पुणे पोलिसांकडून या महिन्यातील शहरातील विविध स्पा सेंटर केलेली पाचवी कारवाई आहे. यामुळे स्पा सेंटरच्या नावाखाली अनधिकृत व्यवहार करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दाणाणले आहे.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *