• May 15, 2023
  • No Comment

किशोर आवारे हत्याप्रकरणात २४ तासांत आरोपींना पकडले, सूत्रधारही शोधला

किशोर आवारे हत्याप्रकरणात २४ तासांत आरोपींना पकडले, सूत्रधारही शोधला

    पुणे : पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. किशोर यांची हत्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी केली, असा आरोप किशोर आवारे यांच्या आईने केला होता. त्यानंतर या आमदाराचं नावही एफआयआरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. परंतु या प्रकरणात आता माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी हत्याच्या २४ तासांत चार आरोपींना पकडले. त्यानंतर सूत्रधारापर्यंतही पोहचले. यामुळे या प्रकरणात पुणे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.


    किशोर आवारे यांची हत्या करणारे चार आरोपी होते. हल्लेखोरांनी खून केल्यानंतर घटनास्थळावरून पळून जाण्यासाठी दोन मोटारसायकली चोरल्या. याप्रकरणी मोटारसायकलच्या ३८ वर्षीय मालकाने पोलिसांत याबाबत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर २४ तासांत पोलिसांनी चक्र फिरवली. या प्रकरणात प्रवीण उर्फ रघुनाथ धोत्रे, आदेश धोत्रे, शाम निगडकर (रा. तळेगाव) आणि नाना उर्फ संदीप विठ्ठल मोरे (रा. पंचतारामनगर, संभाजी चोक, गणेश मंदिराजवळ, आकुर्डी) यांना अटक केली.
    एसीपी पद्माकर घनवट यांनी सांगितले की, पोलिसांनी चारही आरोपींची कसून चौकशी सुरु केली. त्यांचे मोबाईल तपासले. त्यांच्या लोकेशनचे अॅनालिसस केले. त्यानंतर या प्रकरणाचा संबंध गौरव खळदे यांच्याशी असल्याचे समोर आले. मग त्याला ताब्यात घेतले आहे
    गौरव खळदे हा नगरपरिषदेचे माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा आहे. त्यानेच ही हत्या घडवून आणल्याचे तपासात समोर आलेलं आहे. काही महिन्यांपूर्वी जुन्या नगरपरिषद परिसरात भानू खळदे आणि किशोर आवारे यांच्यात खडाजंगी झाली होती. तेव्हा आवारे यांनी भानू खळदे यांच्या कानाखाली लगावली होती. याचाच राग मनात धरून भानू खळदे यांचा मुलगा गौरवने बदला घेण्याचं ठरवलं. त्यानुसार नगरपरिषद कार्यालयातच किशोर आवारे यांची क्रूर पद्धतीने हत्या केली, असे एसीपी पद्माकर घनवट यांनी सांगितले. आरोपींनी गौरव खळदे याने दिलेल्या सुपारीवरुन ही हत्या केल्याची कबुली दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *