• January 7, 2023
  • No Comment

जुगार अड्डयावर छापा टाकुन २२ इसमावर कारवाई करून ०१,२२,८१०/- रू. किमतीचा मुद्देमाल जप्त.

जुगार अड्डयावर छापा टाकुन २२ इसमावर कारवाई करून ०१,२२,८१०/- रू. किमतीचा मुद्देमाल जप्त.

    घोरपडी गाव, वानवडी, पुणे परीसरात पत्र्याच्या शेड
    मध्ये काही इसम बेकायदेशीरपणे जुगार खेळत व खेळवत असलेबाबत प्राप्त
    झालेल्या गोपनिय बातमीदार मार्फतीने खात्रीशीर बातमी मिळाली.
    सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस
    अमंलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवुन छापा टाकला असता, काही इसम
    बेकायदेशीर पैसे लावुन जुगार खेळत व खेळवत असल्याचे मिळुन आल्याने २१
    इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे कडून रोख रक्कम, मोबाईल व जुगाराचे साहित्य
    असा एकुण ०१,२२,८१०/- रू किचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
    सदर प्रकरणी जुगार खेळताना मिळुन आलेले इसम व एक पाहिजे आरोपी


    अशा २२ इसमांविरूध्द वानवडी पोलीस स्टेशन येथे गुरनं. ०७/२०२३, महाराष्ट्र
    जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला
    असुन, त्यांना पुढील कारवाई करीता वानवडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात
    आले आहे.
    सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह
    आयुक्त,श्री.संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री रामनाथ पोकळे, मा.
    पोलीस उप-आयुक्त,गुन्हे, श्री. अमोल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा
    विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार तसेच सपोनि. अनिकेत पोटे, पोलीस
    अंमलदार,राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, इरफान पठाण, पुष्पेंद्र चव्हाण,
    संदीप कोळगे, अमित जमदाडे या पथकाने केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *