• January 7, 2023
  • No Comment

मोक्का मधील ५ वर्षापासुन फरार असलेल्या महिला आरोपीच्या आवळल्या मुसक्या

मोक्का मधील ५ वर्षापासुन फरार असलेल्या महिला आरोपीच्या आवळल्या मुसक्या

    पुणे संगमवाडी येथील संगमवाडी ब्रिज परिसरात इसम नामे अफजल इमाम
    नदाफ व अर्जुन विष्णु जाधव हे मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ विक्री करीत असताना अंमली पदार्थ विरोधी
    पथक १ यांना मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द येरवडा पोलीस स्टेशन गु.र.नं. ११/२०२३ एन. डी. पी. एस. अॅक्ट
    कलम ८(क), २२(क),२९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास सहा पोलीस निरीक्षक
    शैलजा जानकर हया करीत असुन नमुद गुन्हयातील आरोपी नामे अर्जुन विष्णु जाधव, वय ३२ वर्षे, रा, राजुगांधी
    नगर वसाहत, बालगुडे यांचे बिल्डींग समोर संगमवाडी पुणे. हा सहा महिन्यापुर्वी मोक्यामधुन जामीनावर सुटला

    असल्याचे समजले तसेच आरोपी नामे अफजल इमाम नदाफ वय २६ वर्षे, रा. नई जिंदगी गल्ली सितारा
    चौक, सी.पी.ऑफिस जवळ, सोलापुर याने त्यांचेकडे मिळुन आलेला मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ, मुंबई
    येथील एका महिलेने त्यास विक्री करण्याकरता दिला असल्याचे तपासात निषन्न झाल्याने व सदरची महिला हि
    सांताक्रुज मुंबई येथे राहत असल्याची खबर पोलीस अंमलदार मारुती पारधी व पोलीस अंमलदार मनोजकुमार
    साळुंके यांना मिळाली.
    सदर बाबत पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना महिती दिली असता लागलीच नमुद महिलेस
    ताब्यात घेणे बाबत आदेश दिले. दिलेल्या आदेशाप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे यांनी स्टाफसह
    सांताक्रुज मुंबई या परिसरात सदर महिलेचा शोध घेवुन अत्यंत शिताफीने तिला ताब्यात घेतले असता सदरच्या
    महिलेचे नाव जेलुखा मोहम्मद हुसेन कुरेशी ऊर्फ जुलैखाबी ऊर्फ जिल्लो वय ४० वर्षे, रा, टि-१७, सय्यद
    अलीव्ह, प्रभात कॉलनी लेन नं. ९, सांताक्रुझ (ईस्ट) अंधेरी, असे असुन ती रेकॉर्डवरील क्रियाशिल गुन्हेगार


    असल्याचे तसेच तिचे विरूध्द अंमली पदार्थ विरोधी पथक मुंबई यांनी गुरनं ६९३ / २०१४ एनडीपीएस कलम
    ८ (क), २० (ब), २. ०६/२०१२ एनडीपीएस कलम ८ ( क ), २१, असे गुन्हे नोंद असुन खडक पोलीस ठाणे पुणे
    शहर गुरनं ४९२/२०१७ एनडीपीएस कलम ८ ( क ), २१ ( ब ), २९ सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंद कायदा
    या गुन्हयात ती ५ वर्षापासुन पाहिजे असल्याचे समजले.
    सदर महिलेस येरवडा पोलीस स्टेशन गु.र.नं. ११/२०२३ एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क),
    २२(क), २९ मध्ये अटक करण्यात आली आहे. आरोपी क्र. १ ते ३ यांची दि.०९/०१/२०२३ रोजी पर्यंत पोलीस
    कस्टडी रिमांड दिली असुन पुढील तपास सुरु आहे.
    वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदिप
    कर्णिक,मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे मा.सहा
    पो आयुक्त,गुन्हे १ श्री गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर
    कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर,
    पोलीस अंमलदार मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी, ज्ञानेश्वर घोरपडे, विशाल दळवी, राहुल जोशी, संदिप
    शिर्के प्रविण उत्तेकर, पांडुरंग पवार, विशाल शिंदे, सचिन माळवे, संदेश काकडे, रेहाना शेख, नितेश जाधव,
    योगेश मोहिते यांनी केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *