- January 7, 2023
- No Comment
पुण्यातील नागरीक व त्यांचे संपुर्ण कुटुबियांना जीवे मारण्याची धमकी देवुन ३० लाख रुपयांची खंडणी मागणा-या आरोपीस केले जेरबंद
पुण्या मधील एक नागरीक यांना अनोळखी इसमाने मोबाईल व्हॉटसॅपवरुन कॉल करुन ३०
लाख रुपये खंडणी मागणी करुन खंडणीन दिल्यास त्यांचे कुंटुबियांना जीवे मारण्याची धमकी
दिलेबाबत गुन्हे शाखा युनिट-२ येथे अर्ज दिलेला होता. त्याबाबत युनिट- २ प्रभारी श्री. क्रांतीकुमार
पाटील यांनी वरिष्ठांचे आदेशान्वये सहायक पोलीस निरीक्षक, विशाल मोहिते व युनिट मधील
अंमलदार यांची सदर कारवाई कामी टिम तयार केली होती.
दिंनाक ०५/०१/२०२३ रोजी आरोपीने फिर्यादी यांना मोबाईल व्हॉटसॅपव्दारे चॅटींग करुन
प्रथम दहा लाख रुपये प्रथम पीएमसी बिल्डिंग व नंतर गरवारे कॉलेज येथे घेवुन येणेबाबत मॅसेज
केला होता, त्याप्रमाणे युनिट प्रभारी यांनी युनिट मधील अधिकारी व अंमलदार यांची टिम तयार
करुन सापळा लावला होता. आरोपीस संशय आल्याने त्याने पीएमसी येथे न येता गरवारे ब्रिज खाली
येण्यास मेसेज केला होता. त्याप्रमाणे युनिट-२ कडील टिमने गरवारे ब्रिज जवळ जावुन मुलांचे
खेळण्यात वापरणा-या नोटांचे बंडल व काही ख-या नोटा बॅगेत टाकुन बॅग गरवारे ब्रिज खाली
झुडपात ठेवली. त्यावेळी युनिट मधील अंमलदार हे वेगवेगळे पोषाख परिदान करुन नमुद भागात
फिरत होते.आरोपीने बॅग घेतली व मोबाइल टाकुन पळु लागला असता युनिट मधील अधिकारी व
अंमलदार यांनी त्यास पाठलाग करुन शिताफिने पकडुन, त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे
नाव किरण रामदास बिरादार, वय – २४, रा. उदगीर मांजरी सध्या पुणे स्टेशन फिरस्ता असे सांगीतले
त्याचेकडुन गुन्हयात वापरलेले मोबाईल फोन बनावट नोटा व रोख नोटा बॅग असे १०६००/- रुपये
मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. त्याबाबत स्वारगेट पोलीस स्टेशन येथे ०५ / २३, भा.द.वि.क.
३८६,३८७,५०७ अन्वये दाखल करण्यात आलेला आहे तपास स्वारगेट पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा.पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह
आयुक्त,श्री संदिप कर्णिक, मा. अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप-
आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहा.पो. आयुक्त, गुन्हे, श्री गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस
निरीक्षक,श्री.क्रांतीकुमार पाटील, गुन्हे शाखा युनिट-२, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस
निरीक्षक,विशाल मोहिते, पोउपनिरी. नितीन कांबळे, पोलीस अंमलदार, उज्वल मोकाशी, विजयकुमार
पवार,
मोहसिन शेख, संजय जाधव, प्रमोद कोकणे, उत्तम तारु, समीर पटेल, कादिर शेख, गजाजन
सोनुने, निखिल जाधव व नागनाथ राख या पथकाने केलेली आहे.