• January 7, 2023
  • No Comment

सोशल मिडियावर कोयत्याचे स्टेटस ठेवून दहशत पसरविणाऱ्या इसमांना केले गजाआड; गुन्हे शाखा युनिट ६ चा कारवाईचा तडाखा

सोशल मिडियावर कोयत्याचे स्टेटस ठेवून दहशत पसरविणाऱ्या इसमांना केले गजाआड; गुन्हे शाखा युनिट ६ चा कारवाईचा तडाखा

     

    सध्याच्या वाढत्या गुन्हेगारीच्या अनुषंगाने पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कडक कारवाईचा करण्याचे आदेशित केल्याने सदरबाबत गंभीर दखल घेऊन गुन्हे शाखा युनिट ६ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल व त्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार युनिट हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सोशल मिडिया वर कोयत्याचे स्टेटस ठेवून दहशत पसरविणारे तसेच कोयता जवळ बाळगणारे इसमांना सदर पथकाने ताब्यात घेऊन त्यांचेवर लोणीकंद पोलीस स्टेशन येथे भारताचा हत्यारबंदी कायदा अंर्तगत गुन्हे दाखल केले आहेत.


    वाघोली गावचे हद्दीत चोखी धानी रोडवर पेट्रोलिंग करताना इसम नामे १) महादेव संभाजी गर्जे वय २१ वर्षे रा. खांदवे नगर, २) तसेच वाघोली ते आव्हाळवाडी रोडवर सागर अंकुश चव्हाण वय २० वर्षे रा. गणेशनगर, ३) वाघोली ते डोमखेल वस्ती रोडवर ऋतिक बालाजी पोपळघट वय २० वर्षे रा. डोमखेल वस्ती वाघोली, पुणे यांचे ताब्यात कोयते मिळून आल्याने त्यांना पुढील तपासकामी लोणीकंद पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
    सदर कामगिरी माननीय वरिष्ठांचे आदेशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांचे मार्गंदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *