• January 7, 2023
  • No Comment

गांजा तस्करीतील गुन्हयामध्ये सुमारे एक वर्षापासुन फरार असलेल्या आरोपी जेरबंद

गांजा तस्करीतील गुन्हयामध्ये सुमारे एक वर्षापासुन फरार असलेल्या आरोपी जेरबंद

आरोपी कैलास साहेबराव पवार, वय ३५ वर्षे, रा. गट नंबर ३६६
गडदेवस्ती डोंगरगाव, पेरणे, वाडेबोल्हाई रोड पुणे. याचे राहते घरातुन व चारचाकी गाडीतुन एकुण
३३,४१,९००/- रुपये चा ऐवज त्यामध्ये १२८ किलो ७६५ ग्रॅम गांजा, हा अंमली पदार्थ किं.रु.२५,७५,३००/-
रोख रुपये ५०,६००/- एक मोबाईल फोन कि रु १५,०००/- चा एक चारचाकी गाडीतुन कि.रु७,००,०००/-
असा हा अंमली पदार्थ व ऐवज मिळुन आल्याने जप्त करण्यात आला होता. त्यानुसार त्याचे विरुध्द लोणीकंद
पोलीस ठाणे ४९/२०२२ एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब),ii (क) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला
आहे.


सदर गुन्हयामध्ये आरोपी कैलास पवार याचेकडे मिळुन आलेल्या १२८ किलो ७६५ ग्रॅम गांजा
बाबत तपास करता तो त्याने अहमदनगर येथील इसम किशोर किसनराव जेजुरकर
रा, केडगाव, अहमदनगर लोढेमळा याचेकडुन विक्री करीता आणला असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
त्याअनुषंगाने अहमदनगर येथे जावुन किशोर जेजुरकर याचा शोध घेतला असता तो फरार झाला असल्याचे
समजले अंमली पदार्थ विरोधी पथक १ कडील पोलीस अंमलदार योगेश मोहिते यांना त्यांचे बातमीदारामार्फत
माहिती मिळाली की, लोणीकंद पोलीस ठाणे गु.र.नं. ४९ / २०२२ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क),२०(ब),ii
(क), मधिल पाहिजे आरोपी नामे किशोर किसनराव जेजुरकर रा, केडगाव, अहमदनगर लोढेमळा हा त्याचे
रहाते घरी केडगाव येथे आला आहे. सदरची माहिती त्यांनी पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना
कळवुन मिळालेल्या माहिती नुसार केडगाव, अहमदनगर लोढेमळा येथे जावुन नमुद आरोपीस ताब्यात घेणे
बाबत सुचना दिल्या होत्या. मा. वरिष्ठांचे परवानगीने व आदेशान्वये बातमीतील ठिकाणी पोहचल्यानंतर
आरोपीचे घराभोवती सापळा रचुन अत्यंत शिताफीने त्यास ताब्यात घेतले आहे.


वरील नमुद कारवाई ही मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह
आयुक्त.श्री.संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त,
गुन्हे,श्री.अमोल झेंडे,मा.सहा पो आयुक्त, गुन्हे १, श्री गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ
विरोधी पथक,१ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड, सहा पोलीस
निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार योगेश मोहिते, मनोजकुमार साळुंके, विशाल शिंदे,
विशाल दळवी, मारुती पारधी, ज्ञानेश्वर घोरपडे, राहुल जोशी, संदिप शिर्के, प्रविण उत्तेकर, पांडुरंग पवार,
सचिन माळवे, संदेश काकडे, रेहाना शेख, नितेश जाधव यांनी केली आहे.

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *