• January 8, 2023
  • No Comment

बिटकॉईन देण्याचे आमिष दाखवून एकुण १९,७०,८८६/-रु. ची फसवणूक करणा-या प्रमुख सुत्रधारास अटक

बिटकॉईन देण्याचे आमिष दाखवून एकुण १९,७०,८८६/-रु. ची फसवणूक करणा-या प्रमुख सुत्रधारास अटक

यातील फिर्यादी यांचे ऑफिसमध्ये यातील आरोपी मुकुल राहणार मुंबई नावाचे प्रमुख सुत्रधाराने त्याच्या
बिटकॉईन विक्री करणारे कंपनीचे प्रतिनिधी म्हणून सदर ठिकाणी बिटकॉईनचे व्यवहारामध्ये मुकुल याचे सांगण्यावरुन
मिटींग घेवून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादीस प्रथम ३ बीटकॉईन देतो असे सांगून फिर्यादीस आरोपी
शब्बीर शेख याने साथीदार याचे बॅक खात्यावर १९७०८८६/- रु भरण्यास भाग पाडले. पंरतु फिर्यादीस त्यावेळी
बिटकॉईन दिले नाही. फिर्यादी यांनी पैसे परत करण्याची मागणी केली असता त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली व
फसवणूक झालेने अशा आशयाचे तक्रारी वरुन शिवाजीनगर पो.स्टे. ४३ / २०२२ भा. दं. वि. कलम ४१९,४२०,५०६,३४
अन्वये आरोपी नामे १) प्रियेश अनिल राव ऊर्फ शेट्टी ऊर्फ मुकुल, वय – ३४ वर्षे, सध्या रा. डी/१४, द मिस्ट,
इंदीरानगर, दहीवली, ता. कर्जत, जि. रायगड, २) शब्बीर शेख वय – ४१ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. ए विंग, निर्मलनगर
५०२,
सनथॉमस चर्च समोर, मीरा रोड पुव इतर यांचे विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.


सदर गुन्हयामध्ये मुकुल हा बिटकॉईन विक्री करण्याच्या व्यवहारामध्ये प्रमुख सुत्रधार असून तो नाव व
मोबाईल बदलून तसेच राहण्याचे ठिकाण वेळोवेळी बदलत होता. सदर आरोपीचा कोणत्याही प्रकारचा सुगावा
नसताना आरोपीस पोलीस अमंलदार आदेश चलवादी यांनी तात्रिंक मदतीच्या आधारे आरोपीचे छायाचित्र प्राप्त
करून व आरोपीचा सुगावा लागल्याने मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरंविद माने यांनी तात्काळ सायबर पथकातील
सहा पोलीस बाजीराव नाईक व सोबत स्टाफ रूपेश वाघमारे, आदेश चलवादी यांचे पथक रवाना केले.
सदर पथकाने आरोपीचे वावर असलेले ठिकाणी यशस्वी सापळा रचुन आरोपीस ताब्यात घेवून फसवणूक
केल्याचे कबुल केल्याने आरोपीस मुद्देमालासह ताब्यात घेतलेले आहे. उपलब्ध माहीतीचे, तांत्रिक विश्लेषण व गुप्त
बातमीदाराकडुन तपास करुन दि. ६ / ०१ / २३ कर्जत जि. रायगड येथून मुख्य सुत्रधार मुकुल यास ताब्यात घेतले
असता त्याचे नाव व पत्ता प्रियेश अनिल राव ऊर्फ शेट्टी ऊर्फ मुकुल वय-३४ वर्षे सध्या रा. डी/१४, द मिस्ट,
इंदीरानगर, दहीवली, ता. कर्जत, जि. रायगड असे असल्याचे निष्पन्न केले. तपासामध्ये त्याचे घराची झडती घेतली
असता सदर गुन्हातील खालील मुद्देमाल मिळुन आला आहे.
एकुण ७ मोबाईल व १० सिम कार्ड.
वेगवेगळया बॅकांचे१८ बँकखात्याचे पासबुक
वेगवेगळया बॅकांचे ८ डेबिटकार्ड.

एक क्यु आर कोड.
सदर अटक आरोपी मुकुल याने आणखी अशा प्रकारे बिटकॉईनचे आमिष दाखवून कोणाची फसवणूक
केली आहे काय याचा शोध शिवाजीनगर पोलीस स्टेशन करीत आहे. सदर गुन्हयामध्ये त्याचा साथीदार शब्बीर
हद्रदीश शेख वय – ४१ वर्षे, रा. निर्मलनगर सनथॉमस चर्च समोर, मीरा रोड पु. यास ही अटक करण्यात आली
असुन इतर साथीदाराचा शोध चालू आहे. अशा प्रकारे सदर आरोपींताकडून नागरीकांची फसवणूक झाली असल्यास
शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा असे आवाहन करण्यात येत आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री राजेंद्र डहाळे, मा. पोलीस उपआयुक्त
परिमंडळ १ संदीप सिंह गिल्ल, व मा. सहा पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, मा. सहा पोलीस आयुक्त फरासखाना
विभाग (अतिरिक्त कार्यभार विश्रामबाग विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वपोनि श्री.
अरविंद माने, पोनि (गुन्हे) श्री. विक्रम गौड, सायबर पथकाचे सपोनि बाजीराव नाईक, पोलीस अंमलदार रुपेश
वाघमारे, आदेश चलवादी, अर्जुन कुडाळकर, रुचिका जमदाडे यांनी केली आहे.

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *