कदमवाक वस्ती येथील,महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी गर्दी

    कदमवाक वस्ती येथील,महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी गर्दी

    पुणे: कदमवाक वस्ती येथील पंचक्रोशीतील श्रद्धास्थान असलेले महादेव मंदिरा मध्ये महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.पहाटेपासून दुग्धाभिषेक, नाम जप, पालखी मिरवणूकीसह ,भजन , ओम नमः शिवायच्या जयघोषाने मंदिर परिसर शिवमय झाला होता.सकाळ पासून भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.

     

    मंदिर परिसर मध्ये विविध खाद्यपदार्थ, खेळणी व पूजन साहित्याचे स्टॉल मांडले होते .मंदिर समितीच्या वतीने सर्व भाविकांना उपवासाचे पदार्थ प्रसाद म्हणून देण्यात आले . भाविकांना उन्हापासून संरक्षण , व वाहने पार्किंगची सोय करण्यात आली होती. सायंकाळपर्यंत भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता .

    महादेव मंदिर श्री गणेश, पार्वती, शिवलिंग,मूळ मुठा नंदी कटाच्या बाजूला असून येथे अतिशय सुंदर ठिकाण असलेल्या हे देवस्थान असून,व मंदिरातील भव्य असलेले शिवलिंग भाविकांचे आकर्षण ठरते पंचक्रोशीमध्ये हे मंदिर जागृत देवस्थान मानले जाते . महाशिवरात्र निमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई, मंदिरात फुलांची आकर्षक रचना केली होती.

     

    Related post

    मार्केट यार्ड आडते असोसिएशनच्या निवडणुकीचे बिगुल; ३० एप्रिलला मतदान

    मार्केट यार्ड आडते असोसिएशनच्या निवडणुकीचे बिगुल; ३० एप्रिलला मतदान

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : मार्केट यार्डमधील फळ, भाजीपाला, केळी, पान तसेच कांदा-बटाटा विभागातील आडत्यांची शिखर संघटना असलेल्या श्री छत्रपती…
    गुलटेकडी मार्केट यार्डात तुंबलेल्या ड्रेनेजमुळे घाण पाण्याचा पूर; दुर्गंधीने त्रस्त बाजार

    गुलटेकडी मार्केट यार्डात तुंबलेल्या ड्रेनेजमुळे घाण पाण्याचा पूर; दुर्गंधीने…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पूणे : पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात ड्रेनेज लाईन वारंवार तुंबत असल्याने नागरिक, व्यापारी आणि शेतकरी यांना मोठ्या…
    महंमदवाडीत टँकरने दुचाकीला दिली धडक; १९ वर्षीय खेळाडू ठार

    महंमदवाडीत टँकरने दुचाकीला दिली धडक; १९ वर्षीय खेळाडू ठार

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे – भरधाव वेगाने येणाऱ्या पाण्याच्या टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एका तरुण फुटबॉलपटूचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *