• May 5, 2023
  • No Comment

बिना Address Proof आधार कार्डवर अपडेट करा पत्ता

बिना Address Proof आधार कार्डवर अपडेट करा पत्ता

 

प्रत्येक भारतीयासाठी महत्वाचं असलेलं ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड. बँकेत खातं उघडणं, पासपोर्ट, मालमत्ता खरेदी-विक्री, नोकरी किंवा कोणतही सरकारी काम एवढचं काय तर खासगी कार्यालयातही आधार कार्ड हे तुमचं अधिकृत ओळखपत्र म्हणून स्विकारलं जातं.

एकूणचं काय तर आजच्या घडीला तुम्ही कोणतही काम करायला जा आधार कार्ड असणं अपरिहार्य आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाकडे मग तो शालेय विद्यार्थी असो वा ज्येष्ठ नागरिक, आधार नंबर असणं बंधनकारक आहे.

आधार कार्ड अलिकडे अनेक इतर गोष्टींशी जोडण्यात आलेलं आहे. यात बँक खातं, सरकारी योजना आणि पॅन कार्डशी ते जोडण्यात आलेलं आहे. त्यामुळेच आधारमधील माहिती ही अपडेटेड असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा अनेकजण नोकरी किंवा इतर कारणांही घरं बदलंत असतात. अशावेळी आधार कार्डवरही पत्ता अपडेट करणं गरजेचं असतं.

प्रत्येक वेळी आधार कार्ड केंद्रावर जाऊन हा पत्ता बदलणं शक्य होत नाही. यासाठीच ऑनलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे. आता पत्ता अपडेट करायचा म्हंटलं तर Address Proof हवा. मात्र तुमच्याकडे अॅड्रेस प्रूफ नसेल तर? चिंता करायची गरज नाही कारण बिना Address Proof देखील तुम्ही आधार कार्डवरील पत्ता अपडेट करू शकता.

ज्या आधार कार्ड धारकांना त्यांच्या कार्डवर पत्ता अपडेट करायचा आहे ते आपल्या कुटुंब प्रमुखाच्या संमतीने आधारवरील पत्ता बिना कोणतही प्रूफ देता अपडेट करू शकता. मात्र यासाठी कुटुंब प्रमुखाची परवानगी गरजेची असेल. यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

आधारवर पत्ता अपडेट करण्यासाठी My Aadhar पोर्टलवर https://myaadhaar.uidai.gov.in/ जाऊन कुटुंब प्रमुखाचं नाव अपडेट करावं.

तुम्हाला My Aadhaar पोर्टलवर जाऊन आधार अपडेट या प्रक्रियेला सिलेक्ट करायंच आहे.

त्यानंतर आधार Address Update पर्याय निवडावा.

इथे तुम्हाला कुटुंबातील प्रमुख सदस्याचे म्हणजेच Head Of Family चं आधार नंबर टाकावा लागेल.

त्यानंतर तुम्हाला हेड ऑफ फॅमिलीसोबत तुमचं नात काय आहे हे सांगणारं म्हणजेच रिलेशनशीप प्रूफचं एखादं डॉक्यूमेंटची कॉपी जोडावी लागेल.

आधार कार्डवर पत्ता अपडेट करण्यासाठी ५० रुपये शुल्क भरावं लागेल.

यानंतर त्या कुटुंब प्रमुखाला HOF ऐड्रेस अपडेटच्या रिक्वेस्टला ३० दिवसांच्या आत अप्रूव्ह करावं लागेल. त्यासाठी कुटुंब प्रमुखाला My Aadhaar पोर्टलवर लॉगइन करावं लागेलं.

आधार कार्ड अपडेटसाठी आवश्यक कागदपत्र:

जर तुम्ही कुटुंब प्रमुखाच्या मदतीने आधार कार्डवर पत्ता अपडेट करत असाल तर यासाठी कुटुंब प्रमुखाकडे काही कागदपत्र आवश्यक आहे. यात रेशन कार्ड, मार्कशीट, मॅरेज सर्टिफिकेट किंवा पासपोर्ट यापैंकी एक डॉक्यूमेंट असणं गरजेचं आहे. या कागदपत्रांच्या आधारे तुम्ही कुटुंबातील प्रमुखासोबत तुमचं नात वेरिव्हाय करू शकता. जर यापैकी कोणतचं कागदपत्र नसतील तर कुटुंब प्रमुख सेल्फ डिक्लरेशन फॉर्मच्या मदतीने आधारवर पत्ता अपडेट करू शकता.

कोणाला होईल फायदा:

ज्या लोकांकडे कोणतंही रहिवासी प्रमाणपत्र नाही किंवा Address Proof नाही अशा लोकांसाठी UIDAI ची ही सुविधा अतिशय सोयीची आहे. त्यामुळेच आता अनेकांची चिंता मिटणार आहे. घरबसल्या कोणत्याही Address Proof शिवाय पत्ता अपडेट करता येणार आहे.

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *