• May 5, 2023
  • No Comment

पुणे स्टेशन परिसरात युवकाला बेदम मारहाण करून लुटले

पुणे स्टेशन परिसरात युवकाला बेदम मारहाण करून लुटले

    पुणे : पुणे स्टेशन परिसरात युवकाला बेदम मारहाण करून लुटण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी दोघांना अटक केली.किरण धनराज खरात (वय २८, रा. ताडीवाला रोड) आणि आफताब अयुब शेख (वय २२, रा. लुंबिनीनगर, बंडगार्डन रस्ता) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या बरोबर असलेला साथीदार पसार झाला आहे. याबाबत संदेश अवताडे (वय १८, रा. शिवाजीनगर) याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदेश आणि त्याचा मित्र रात्री पुणे स्टेशन परिसरात फिरायला गेले होते. त्या वेळी तिघांनी संदेशला अडवले आणि गजाने मारहाण केली. त्याच्या मोबाइलमधील बँक ॲपद्वारे ७१० रुपये चोरट्यांनी ऑनलाइन जमा करुन घेतले. पोलीस उपनिरीक्षक धनवडे तपास करत आहेत.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *