• February 26, 2023
  • No Comment

ठेकेदाराकडून लाच घेणाऱ्या महावितरणच्या अभियंत्याला पकडले

ठेकेदाराकडून लाच घेणाऱ्या महावितरणच्या अभियंत्याला पकडले

    विद्युत ठेकेदाराकडून दोन हजारांची लाच घेणाऱ्या महावितरणच्या राजगुरूनगर उपविभागातील कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.अजय दत्तात्रय शेवकरी असे लाचखोर अभियंत्याचे नाव आहे. याबाबत एका विद्युत ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
    तक्रारदाराने घरगुती ग्राहकांच्या वीजजोड कामाचे मंजुरी पत्रक शेवकरी यांच्याकडे सादर केले होते. शेवकर यांनी ठेकेदाराकडे सहा हजार रुपयांची लाच मागितली होती. ठेकेदाराने तडजोडीत दोन हजार रुपयांची लाच देण्याचे मान्य करुन तक्रार नोंदविली. त्यानंतर राजगुरुनगर येथील महावितरणच्या कार्यालयात सापळा लावून शेवकरी यांना पकडण्यात आले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक क्रांती पवार आणि पथकाने ही कारवाई केली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *