• February 27, 2023
  • No Comment

दिव्यांग मुलाला शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्याने जबर मारहाण

दिव्यांग मुलाला शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्याने जबर मारहाण

    पुणे : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दिव्यांग मुलाला शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्याने जबर मारहाण केली आहे. या मारहाणीमध्ये हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे, मुलाचे हाड फॅक्चर झाले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मारहाण करणारा शिक्षक आणि कर्मचारी यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिक्षक विकास बाजीराव घोगरे आणि कर्मचारी सुभाष दिलीप ठोकळ असं या प्रकरणातील आरोपींचं नाव आहे.

    घटनेबाबत अधिक माहिती अशी की हा सर्व प्रकार जुन्नर तालुक्यातील धामनखेल येथील विशेष मुलांच्या शाळेत घडला आहे. शाळेचे शिक्षक विकास बाजीराव घोगरे व कर्मचारी सुभाष दिलीप ठोकळ यांनी एका दिव्यांग मुलाला जबर मारहाण केली आहे. या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पीडित मुलगा गतिमंद आणि अपंग असून, त्याने नुकताच या शाळेत प्रवेश घेतला होता.

    शिक्षक आणि कर्मचाऱ्याने केलेल्या मरहाणीमध्ये हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या मुलाला जबर मारहाण करण्यात आली. या मुलाच्या डाव्या हातावर जखमांचे व्रण आहेत, शाळेतील लोखंडी पाईपने डाव्या हाताच्या खांद्यावर , उजव्या पायाच्या घोट्यावर आणि इतर ठिकाणी मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीमध्ये मुलाचे हाडं फॅक्चर झाले आहेत. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *