• February 26, 2023
  • No Comment

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

    लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करणाऱ्या व नंतर ती गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपात करणाऱ्या डॉक्टरविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित डॉक्टरने तरुणीकडून साठ हजार रुपये उसने घेत तिची फसवणूक केली आहे. ही घटना सप्टेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान घडली.

    डॉ. अंकुश गुंड (रा. गणेश व्हिला, आंबेगाव) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी २६ वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीचे वडील आजारी असताना वडिलांचे रिपोर्ट दाखविण्यासाठी ती डॉक्टरांकडे गेली असता दोघांची ओळख झाली. या ओळखीतून फिर्यादी तरुणी आणि डॉ. अंकुश गुंड यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर तरुणी गर्भवती असताना डॉक्टरने तिला औषधी गोळ्या खायला देऊन गर्भपात केला. तिचा मोबाइल आणि साठ हजार रुपये घेऊन फसवणूक केली. त्यानंतर तरुणी पुन्हा गर्भवती असताना डॉ. अंकुश गुंडने तिला मारहाण केली. तसेच पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *