• November 4, 2022
  • No Comment

फरार सराईत गुन्हेगार रुपेश मारणेला मुळशीतून अटक, गुन्हे शाखेची कारवाई

फरार सराईत गुन्हेगार रुपेश मारणेला मुळशीतून अटक, गुन्हे शाखेची कारवाई

    पुणे: गजा मारणे टोळीतील सराईत गुन्हेगार रुपेश मारणेला साथीदारासह अटक ; मुळशीत गुन्हे शाखेची कारवाई गजा मारणे याच्या टोळीतील फरार सराईत गुन्हेगार रुपेश मारणे याला साथीदारासह पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुळशी परिसरातून रात्री अटक केली आहे. रुपेश मारणे आणि संतोष शेलार अशी अटक केलेल्या दोघा फरार गुंडाची नावे आहेत.

    सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर आणि पथकाने ही कारवाई केली.

    शेअर बाजारात गुंतवलेल्या ४ कोटी रुपयांच्या बदल्यात २० कोटी रुपयांची मागणी करुन त्यासाठी शेअर दलालाचे अपहरण करुन त्याला मारहाण केल्या प्रकरणी गुंड गजा मारणे याच्यासह १५ जणांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का कारवाई केली. गजा मारणे याला अटक करण्यात आली आहे. रुपेश मारणे आणि साथीदार फरार होते. एका व्यावसायिकाने बांधकाम व्यवसायासाठी १ कोटी ८५ लाख रुपये घेतले होते. त्या बदल्यात २ कोटी ३० लाख रुपये परत दिले होते. तरीही आणखी ६५ लाखांची मागणी करुन या व्यावसायिकाला धमकाविले जात होते. याप्रकरणी रुपेश मारणेसह चौघांवर नुकताच गुन्हा दाखल झाला आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *