- November 4, 2022
- No Comment
जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा,सतरा जणांच्या टोळीवर कारवाई
बंडगार्डन: बंडगार्डन येथे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पाळत ठेवून छापा टाकला आहे. 17 जणांवर कारवाई करत पोलिसांनी 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलिसांना या जुगार आड्ड्या बद्द्ल बातमीदारा मार्फत खबर मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरात पाळत ठेऊन छापा टाकला असता काही इसम हे बेकायदेशीररित्या जुगार खेळत असल्याचे समोर आले आहे. यावेळी पोलिसांनी 24 हजार 720 रुपये रोख, 77 हजार रुपयांचे 16 माबाईल असा एकूण 1 लाख 1 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींवर महाराष्ट्र जुगारबंदी कायद्या अंतर्गत बंजगार्डन येथे गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. आरोपींना पुढिल तपासासाठी बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई सामाजीक सुरक्षा विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील,पोलीस अमंलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, मनिषा पुकाळे, हणमंत कांबळे, संदिप कोळगे, अमित जमदाडे, पुष्णेंद्र चव्हाण यांच्या पथकाने केली.