- November 1, 2022
- No Comment
विमानतळ पोलिसांची धडक कारवाई; पिस्टल जप्त व ०६ जिवंत राऊंड जप्त
पुणे: विमानतळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळ पोलिसांची धडक कारवाई करत एका आरोपीकडून दोन पिस्टल व ०६ जिवंत राऊंड जप्त केले आहेत.
रामकृष्ण विश्वास भोंडवे (वय ३८ वर्षे मुळ पत्ता गणेश हौसीग सोसायटी, चिचवड, पुणे) असे अटक केलेल्या आरोपी चे नाव आहे.
विमानतळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे, पोलिस निरीक्षक, गुन्हे, मंगेश जगताप पोलिस उप निरीक्षक रविंद्र ढावरे व तपास पथकातील स्टाफ असे पोलिस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. पोना सचिन जाधव व सचिन कदम यांना त्यांचे बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, पोरवाल रोड, डि. वाय. पाटील, कॉलेज जवळ, टि जंक्शन समोर, मोकळया मैदानात एक जण थांबलेला असून त्याचेकडे पिस्टल व राऊंड असुन तो कोणाची तरी वाट पाहत आहे. त्याप्रमाणे सदरची बातमी विलास सोंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विमानतळ पोलिस स्टेशन पुणे शहर यांना कळविली.
बातमीची खात्री करुन शहानिशा करुन कारवाई करा असे तोंडी आदेश त्यांनी दिले. त्याप्रमाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलिस उप निरीक्षक ढावरे व स्टाफ यांनी सापळा लावुन आरोपीस पकडले. त्याच्याकडे ९१,०००/- रुपये किंमतीचे ०२ गावठी बनावटीचे पिस्टल व ०६ जिवंत राऊंड मिळून आले असून, ते जप्त करण्यात आले आहेत. त्याच्याविरुध्द विमानतळ पोलिस स्टेशन पुणे शहर येथे
गु.र.नं. ४१०/२०२२ शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३, २५ व महाराष्ट्र पोलिस अॅक्ट कलम ३७(१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. तसेच सदरचा पिस्टल कोठून व कशासाठी आणले होते याबाबत पुढील तपास पोलिस उप निरीक्षक रविंद ढावरे करीत आहेत.
सदरची कारवाई ही पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, संदिप कर्णिक, सह आयुक्त, नामदेव चव्हाण अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, रोहिदास पवार, पोलिस उपायुक्त परिमंडळ ०४ पुणे शहर, किशोर जाधव सहा. पोलिस आयुक्त, येरवडा विभाग पुणे शहर, यांचे आदेशान्वये विलास सोंडे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विमानतळ पोलिस स्टेशन पुणे शहर व मंगेश जगताप पोलिस निरीक्षक (गुन्हे) विमानतळ पोलिस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक रविंद्र ढावरे पोलिस स्टाफ अविनाश शेवाळे, गणेश साळुंके, सचिन कदम, सचिन जाधव, रुपेश पिसाळ, नाना कर्चे, योगेश थोपटे, रुपेश तोडेकर यांचे पथकाने केली आहे.