• January 1, 2023
  • No Comment

नाशिकमधील इगतपुरी तालुक्यातील जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीला भीषण आग लागली आहे

नाशिकमधील इगतपुरी तालुक्यातील जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीला भीषण आग लागली आहे

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील कंपनीला भीषण आग लागली आहे. ही आग प्रचंड असून परिसरात धुराचे लोट उसळले आहेत. जिंदाल पॉलिफिल्म्स या कंपनीला आग लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीत काही कामगार जखमी झाल्याचे वृत्त आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव जवळ असलेल्या जिंदाल पॉलिफिल्म्स या कंपनीला आग लागल्यानंतर मोठे स्फोट ऐकू आले. कंपनीत असलेल्या रसायनांचा स्फोट झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काहींच्या मते हा स्फोट बॉयलरचा झाला असल्याचे सांगण्यात येते. आगीचे नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. आग भीषण असून प्रचंड धुराचे लोट उसळले आहे. महामार्गावरूनदेखील या आगीच्या धुराचे लोट दिसत आहेत.


या कंपनीत एक हजारांहून अधिक कामगार काम करतात. यामध्ये महिलांचाही समावेश आहे. सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास मोठा स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली. कंपनीत अडकलेल्या कामगारांची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आगीची माहिती समजताच अग्निशमन दल आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीतील केमिकल स्टोरेजला आग लागली आहे. या आगीत काही जण जखमी झाले आहेत. 11 जणांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे. आगीत कितीजण अडकले याबाबत नेमका आकडा समोर आला नाही. सध्या अग्निशमन दलाचे आठ बंब आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. घटनास्थळी रुग्णवाहिकादेखील दाखल झाल्या आहेत. आगीची माहिती मिळताच नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक, विभागीय महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Related post

घरात घुसून ९ वर्षीय मुलीवर ‘लैंगिक अत्याचार’; १९ वर्षीय तरूणाला १० वर्षे ‘सक्तमजुरी’

घरात घुसून ९ वर्षीय मुलीवर ‘लैंगिक अत्याचार’; १९ वर्षीय…

पुणे: बेकायदेशीरपणे घरात घुसून नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला १० वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व…
महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक

महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीला लावतो, असे आमिष दाखवून २१ लाख २० हजार रुपये घेतले. मात्र, नोकरीला न लावता तसेच रक्कम परत…
थकबाकीदारांच्या १६ हजार २६५ मालमत्ता सील; महापालिकेकडून धडक कारवाई

थकबाकीदारांच्या १६ हजार २६५ मालमत्ता सील; महापालिकेकडून धडक कारवाई

पिंपरी: मार्च अखेर जवळ येत असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई तीव्र केली आहे. आतापर्यंत तब्बल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *