• January 2, 2023
  • No Comment

पिंपरी चिंचवडमधील गायब झालेल्या वकिलाची हत्या प्रेमप्रकरणातून

पिंपरी चिंचवडमधील गायब झालेल्या वकिलाची हत्या प्रेमप्रकरणातून

    पिंपरी चिंचवडमधील गायब झालेल्या वकिलाची हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. वकील शिवशंकर शिंदे यांचा मृतदेह हा अर्धवट जळालेल्या अवस्थेत महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील मदनुर इथे आढळला होता. वकिलाचे नात्यातीलच विवाहित महिलेशी संबंध होते अन् त्या महिलेच्या पतीनेच अपहरण करून ही हत्या केली अन् पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. हे आत्तापर्यंतच्या तपासात समोर आलेलं आहे.


    शिवशंकर शिंदे यांचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. नांदेड जिल्ह्यात हा मृतदेह आढळला असून तिथल्या पोलिसांनी तिघांना ताब्यातही घेतलं होतं. आता त्या तिघांचा ताबा पिंपरी चिंचवड पोलिसांनी घेतलेला आहे. त्यात संबंधित विवाहित महिलेचा पती, पतीचा भाचा आणि त्याचा चालक अशा तिघांचा यात समावेश आहे. त्यांनी वकिलाचे 31 डिसेंबरच्या दुपारी कार्यालयातून अपहरण केले. हात-पाय अन् तोंड बांधून वकिलास एका ड्रममध्ये बसवले. मग हा ड्रम एका टेम्पोत टाकून नांदेड जिल्ह्याच्या टोकाला आणले अन् तिथंच अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. पण पिंपरी चिंचवड ते नांदेड या दरम्यानच्या काळात हत्या कशी केली, हे पुढील तपासात निष्पन्न होणार आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *