• January 2, 2023
  • No Comment

सहा महीन्याच्या बाळाचा सहारा घेवुन, मोबाईल चोरी करणारी महीला समर्थ पोलीसांच्या जाळयात लाखो किंमतीचे मोबाईल जप्त

सहा महीन्याच्या बाळाचा सहारा घेवुन, मोबाईल चोरी करणारी महीला समर्थ पोलीसांच्या जाळयात लाखो किंमतीचे मोबाईल जप्त

    समर्थ पोलीस
    स्टेशन हददीत समर्थ पोस्टेचे सपोनि प्रसाद लोणारे, मपोउनि मिरा त्रंबके, मपोना रुपाली काळे व तपास
    पथकाचे अंमलदार असे पेट्रोलींग करीत असतांना मपोउनि मिरा त्रंबके यांना गोपनिय खबर मिळाली की,
    एक मोबाईल चोर महीला आपल्या सहा महीन्याच्या बाळाचा सहारा घेवुन चोरी करीत असल्याबाबत
    माहीती मिळाली त्यावरुन सदर महीलेस मपोउनि त्रंबके यांनी तिच्या बाळासह ताब्यात घेवून चौकशी केली


    असता तिचेकडे विवीध कंपन्याचे १२ महागडे मोबाईल मिळुन आले. सदर मोबाईल बाबत तिचेकडे सखोल
    चौकशी केली असता तिने सदरचे मोबाईल रेल्वेमध्ये प्रवास करतांना व पुणे शहरामध्ये गर्दीचा फायदा
    घेवुन आपल्या लहान बाळाच्या सहा-याने चोरी केली असल्याची कबुली दिली.
    सदरची महीला ही मुळची उत्तरप्रदेश मधील असुन सध्या तिचे वास्तव्य दिल्ली येथे आहे. आपल्या
    लहान बाळाला कडेवर घेवुन एखादया महीलेच्या मागे उभे राहुन तिचे पर्स मधुन सदरचे मोबाईल चोरी
    करीत होती. कडेवर लहान बाळ असल्याने तिचेवर कोणी संशय घेत नव्हते. सदरची महीला ही दिल्लीवरुन


    एखादया रेल्वेने प्रवास करीत होती व आपल्या बाळाच्या आडोश्याने महागडे मोबाईल चोरायचे. तसेच
    शहरामध्ये गर्दीचे ठिकाण पाहुन महीलांच्या पर्स मधुनही अश्याच प्रकारे मोबाईल चोरी करीत असल्याचे
    तपासात निष्पन्न झाले आहे. सदर महीलेकडुन एकुण विवीध कंपन्याचे १,४०,०००/-रुकिंमतीचे १२ महागडे
    मोबाईल जप्त करण्यात आलेले आहे. सदर महीलेसोबत तिचे आणखी काही साथिदार असण्याची दाट
    शक्तता असुन पुढील तपास समर्थ पोलीस स्टेशन करीत आहे.
    सदरची कामगिरी ही समर्थ पो.स्टे,
    श्री.रमेश साठे, पोलीस निरीक्षक, (गुन्हे) श्री प्रमोद वाघमारे यांचे सुचनेनुसार तपास पथकाचे सहा. पोलीस
    निरीक्षक प्रसाद लोणारे, मपोउनि मिरा त्रंबके, मपोना रुपाली काळे, पोलीस अंमलदार हेमंत पेरणे, रहिम
    शेख, कल्याण बोराडे, दत्तात्रय भोसले, गणेश वायकर, प्रमोद जगताप, रोहीदास वाघीरे, सुभाष पिंगळे, श्याम
    सुर्यवंशी,यांनी केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *