- January 2, 2023
- No Comment
पिस्टल बेकायदेशीरपणे बाळगून दहशत माजविण्याचा प्रयत्नात असलेल्या आरोपीस तपास पथक येरवडा पोलीस स्टेशन कडून अटक
येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत
असताना तपास पथकातील अंमलदार पोहवा दत्ता शिंदे, तुषार खराडे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे यांना
त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, इसम नामे विकास भगत तौर हा क्षिरसागर हॉलचे मागे
येरवडा पुणे थांबलेला असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची बातमी मिळाल्याने सदरची बातमी वरिष्ठ
पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन यांना कळवून त्यांनी कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले.
त्याप्रमाणे तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे, पोलीस
अंमलदार पोहवा दत्ता शिंदे, तुषार खराडे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे यांनी इसम नामे विकास भगत तौर
वय ३५ वर्षे रा.स.नं.१२ क्षिरसागर हॉल येरवडा पुणे यास क्षिरसागर हॉलचे मागे येरवडा पुणे येथे सापळा
रचून पकडण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्टल मिळून आले. सदरबाबत
येरवडा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.६२० / २०२२ भारतीय हत्यार कायदा ३ (२५) महाराष्ट्र पोलीस अॅक्ट
कलम ३७(१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि विशाल पाटील करत आहेत.
सदरची कामगिरी तपास पथकाचे अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे, सपोफौ प्रदिप सुर्वे,
पो.अमंलदार गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, अमजद शेख, सागर जगदाळे, कैलास
डुकरे,किरण अब्दागिरे, प्रविण खाटमोडे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे, अनिल शिंदे, काशिनाथ गद्दे यांनी
केलेली आहे.