• January 2, 2023
  • No Comment

सिंहगड कॅम्पस मध्ये कोयत्याने दहशत माजवणारे मोरक्याच्या बीड येथुन आवळल्या मुसक्या

सिंहगड कॅम्पस मध्ये कोयत्याने दहशत माजवणारे मोरक्याच्या बीड येथुन आवळल्या मुसक्या

    सिंहगड कॅम्पस मध्ये फिर्यादी हे त्यांचे मित्रांसोबत गप्पा
    मारत बसले असताना, नमुद आरोपी करण अर्जुन दळवी व त्याचा साथीदार यांनी दहशत
    पसरविण्याच्या इरादयाने हातात लोखंडी कोयता घेवुन, हातातील कोयता हवेत फिरवुन येणारे-जाणारे
    लोकांना धाक दाखवुन दुकानांचे शटरवर वार करुन रोडचे कडेला असलेल्या गाडयांवर कोयता मारुन
    दहशत निर्माण केल्याने तेथील लोकांनी दुकाने बंद करुन सैरावैरे पळुन गेली. त्यावेळी तेथील स्टुल


    फिर्यादी यांचा मित्र तन्मय ठोंबरे याचे पाठीवर फेकुन मारला. तसेच फिर्यादी यांचे मानेवर जीवे
    मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार करुन जखमी केले होते. सदरबाबत भारती विद्यापीठ पोलीस
    स्टेशन गुन्हा रजि नं.८७७ / २०२२ भादंवि कलम ३०७, ३२३, ५०४,४२७, ३४, महाराष्ट्र पोलीस अधिनियक
    कलम ३७ (१) (३) १३५, भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५, क्रिमीनल अमेंन्टमेंट अॅक्ट कलम ७
    अन्वये गुन्हा दाखल आहे.


    दाखल गुन्हयातील आरोपी करण अर्जुन दळवी याचा भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे तपास
    पथकाचे अधिकारी व अंमलदार हे शोध घेत असताना पोलीस अंमलदार, हर्षल शिंदे व धनाजी धोत्रे
    यांना आरोपी करण अर्जुन दळवी हा बीड येथे लपुन बसला आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने
    वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीहरी बहीरट यांनी लागलीच तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-
    निरीक्षक,धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार, हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे व सचिन गाडे यांनी आरोपीचा शोध
    घेणेकामी रवाना केले होते. त्यानुसार त्यांनी बीड येथे जावुन आरोपी करण अर्जुन दळवी, वय – २१ वर्षे,
    रा.माणिकबाग, सिंहगड रोड, पुणे याचा शोध घेतला असता तो साठे चौक, बीड येथे मिळुन आल्याने
    त्यास ताब्यात घेवुन अटक केली आहे.
    सदरची कामगिरी भारती विदयापीठ
    पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे), विजय
    पुराणिक, सहा. पोलीस निरीक्षक, अमोल रसाळ, पोलीस उप-निरीक्षक, धिरज गुप्ता, पोलीस
    अंमलदार,हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, शैलेश साठे, सचिन सरपाले, चेतन गोरे, मंगेश पवार,
    निलेश ढमढेरे, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, निलेश खैरमोडे, अशिष गायकवाड, अभिनय चौधरी,
    मितेश चोरमोले व राहुल तांबे यांचे पथकाने केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *