• January 1, 2023
  • No Comment

जमिन मोजणीला विरोध केल्याप्रकरणी आठ ते नऊ टाळक्यांवर गुन्हा दाखल

जमिन मोजणीला विरोध केल्याप्रकरणी आठ ते नऊ टाळक्यांवर गुन्हा दाखल

 

खेड: पोलीस बंदोबस्तात सुरु असलेल्या जमीन मोजणीला विरोध करत मारामारीची धमकी देणाऱ्या आठ ते नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना खेड जवळील मोई येथे घडली आहे.

याप्रकरणी परिक्षण भूमापक अमोल सुरेश चौधरी (वय 38) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुलाब दशरथ करपे, सचिन तुकाराम गवारी व त्याचे पाच ते सहा साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे भिमाई अर्जून कळमकर तर्फे कुलमुख धारक राजेंद्र अर्जून कळमकर यांच्या जमिन गट नंबर 489 या जमीन गटाची मोजणी करत होते. यावेळी मोजणीचा अर्ज कऱणारे अर्जदार, पोलीस बंदोबस्त असताना देखील आरोपी तेथे आले व त्यांनी जमीन मोजणी प्रक्रीयेला हरकत घेतली. आरोपी हे जमिन गट क्रमांक 489 मधील जमीनधारक आहेत. यावेळी त्यांनी जमीन मोजणी करायची नाही. केली तर आम्ही भांडणे व मारामारी करू अशी धमकी दिली. तसेच, हातात दगड घेऊन भिती दाखवली. त्यामुळे फिर्यादीला मोजणी थांबवावी लागली. यावरून सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Related post

घरात घुसून ९ वर्षीय मुलीवर ‘लैंगिक अत्याचार’; १९ वर्षीय तरूणाला १० वर्षे ‘सक्तमजुरी’

घरात घुसून ९ वर्षीय मुलीवर ‘लैंगिक अत्याचार’; १९ वर्षीय…

पुणे: बेकायदेशीरपणे घरात घुसून नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला १० वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व…
महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक

महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीला लावतो, असे आमिष दाखवून २१ लाख २० हजार रुपये घेतले. मात्र, नोकरीला न लावता तसेच रक्कम परत…
थकबाकीदारांच्या १६ हजार २६५ मालमत्ता सील; महापालिकेकडून धडक कारवाई

थकबाकीदारांच्या १६ हजार २६५ मालमत्ता सील; महापालिकेकडून धडक कारवाई

पिंपरी: मार्च अखेर जवळ येत असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई तीव्र केली आहे. आतापर्यंत तब्बल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *