• December 3, 2022
  • No Comment

पुण्यात लाखाेंचा काेराेना टेस्टिंग घाेटाळा; बड्या अधिकाऱ्यांकडून घाेटाळा दाबण्याचा प्रयत्न

पुण्यात लाखाेंचा काेराेना टेस्टिंग घाेटाळा; बड्या अधिकाऱ्यांकडून घाेटाळा दाबण्याचा प्रयत्न

    पुणे : काेराेनाकाळात शासनाकडून महापालिकेला काेराेना तपासणीसाठी मिळालेल्या ‘रॅपिड अँटीजन किट’ प्रकरणात माेठा घाेटाळा उघडकीस आला आहे. वारजे येथील महापालिकेच्या डाॅ. अरविंद बारटक्के दवाखान्यातील स्वॅब सेंटरवर आलेल्या साडेअठरा हजार तपासणी किटपैकी ६० ते ८० टक्के किट रुग्णांसाठी न वापरता त्यांची परस्पर विक्री करून त्याजागी तब्बल ११ हजारांहून अधिक बाेगस रुग्णांच्या नाेंदी केल्याचा व त्यांना एसएमएस जाऊ नये म्हणून रुग्णांऐवजी सेंटरवरील डाॅक्टर व कर्मचाऱ्यांचे नंबर नाेंद केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घाेटाळ्यातून ३४ लाख रुपये या केंद्रावरील डाॅक्टर व कर्मचाऱ्यांनी लाटल्याचे वारजे माळवाडी पाेलिसांच्या प्राथमिक तपासातही निष्पन्न झाले असून, तसे पत्रही पाेलिसांनी महापालिकेला दिले आहे. तर, तक्रारदाराच्या मते ही रक्कम ८० ते ९० लाख रुपये आहे.

     


    जेव्हा माणसांची जीवन मरणाशी झुंज सुरू हाेती, ज्यावेळी लाेक डाॅक्टरांना देव समजत हाेते, त्या काेराेनाकाळात हा भ्रष्टाचार घडल्याने पुण्याच्या महापालिकेच्या आराेग्य खात्याची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. या भ्रष्टाचाराला बारटक्के दवाखान्यातील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डाॅ. सतीश काेळसुरे यांनी आराेग्य यंत्रणेकडे व पाेलिसांसह ३२ ठिकाणी तक्रार करत या प्रकरणाला वाचा फाेडली आहे. हा प्रकार जानेवारी ते डिसेंबर २०२१ दरम्यान घडला आहे. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार व वारजे पाेलिसांच्या तपासानुसार या घाेटाळ्याचा ठपका वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डाॅ. अरुणा तारडे, तत्कालीन कंत्राटी तत्त्वावरील स्वॅब सेंटरचे प्रमुख डाॅ. ऋषिकेश गारडी तसेच महापालिकेचे आराेग्य प्रमुख डाॅ. आशिष भारती यांच्यावरपुणे : काेराेनाकाळात शासनाकडून महापालिकेला काेराेना तपासणीसाठी मिळालेल्या ‘रॅपिड अँटीजन किट’ प्रकरणात माेठा घाेटाळा उघडकीस आला आहे. वारजे येथील महापालिकेच्या डाॅ. अरविंद बारटक्के दवाखान्यातील स्वॅब सेंटरवर आलेल्या साडेअठरा हजार तपासणी किटपैकी ६० ते ८० टक्के किट रुग्णांसाठी न वापरता त्यांची परस्पर विक्री करून त्याजागी तब्बल ११ हजारांहून अधिक बाेगस रुग्णांच्या नाेंदी केल्याचा व त्यांना एसएमएस जाऊ नये म्हणून रुग्णांऐवजी सेंटरवरील डाॅक्टर व कर्मचाऱ्यांचे नंबर नाेंद केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घाेटाळ्यातून ३४ लाख रुपये या केंद्रावरील डाॅक्टर व कर्मचाऱ्यांनी लाटल्याचे वारजे माळवाडी पाेलिसांच्या प्राथमिक तपासातही निष्पन्न झाले असून, तसे पत्रही पाेलिसांनी महापालिकेला दिले आहे. तर, तक्रारदाराच्या मते ही रक्कम ८० ते ९० लाख रुपये आहे.


    जेव्हा माणसांची जीवन मरणाशी झुंज सुरू हाेती, ज्यावेळी लाेक डाॅक्टरांना देव समजत हाेते, त्या काेराेनाकाळात हा भ्रष्टाचार घडल्याने पुण्याच्या महापालिकेच्या आराेग्य खात्याची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. या भ्रष्टाचाराला बारटक्के दवाखान्यातील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डाॅ. सतीश काेळसुरे यांनी आराेग्य यंत्रणेकडे व पाेलिसांसह ३२ ठिकाणी तक्रार करत या प्रकरणाला वाचा फाेडली आहे. हा प्रकार जानेवारी ते डिसेंबर २०२१ दरम्यान घडला आहे. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार व वारजे पाेलिसांच्या तपासानुसार या घाेटाळ्याचा ठपका वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डाॅ. अरुणा तारडे, तत्कालीन कंत्राटी तत्त्वावरील स्वॅब सेंटरचे प्रमुख डाॅ. ऋषिकेश गारडी तसेच महापालिकेचे आराेग्य प्रमुख डाॅ. आशिष भारती यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
    या प्रकरणाचा वारजे पाेलिस ठाण्यातील तत्कालीन पाेलीस उपनिरीक्षक साेनाली कथले यांनी तपास करून त्याची पाळेमुळे खणली आहेत. त्यामध्ये बारटक्के दवाखान्यात जानेवारी ते डिसेंबर २०२१ दरम्यान १८ हजार ५०० रॅपिड चाचण्या केल्याची नाेंद आहे. त्यापैकी वारजे पाेलिसांनी रँडम पद्धतीने १६५ जणांना संपर्क करून चाैकशी केली असता त्याद्वारे धक्कादायक गाेष्टी उघडकीस आल्या आहेत. १६५ पैकी फक्त १८ जणांनी या केंद्रावर काेराेना चाचणी केल्याचे सांगितले. तर ३७ जणांचा संपर्क झालेला नाही व ९ जणांनी फाेन उचलला नाही यांची संख्या ६४ आहे. या ६४ जणांची चाचणी झाली असे गृहीत धरून पाेलिसांनी १६५ मधून ६४ वजा करता १०१ म्हणजेच ६१ टक्के नाेंदी पाेलिसांच्या तपासात बाेगस आढळल्याची नाेंद केली आहे. ठेवण्यात आला आहे.
    या प्रकरणाचा वारजे पाेलिस ठाण्यातील तत्कालीन पाेलीस उपनिरीक्षक साेनाली कथले यांनी तपास करून त्याची पाळेमुळे खणली आहेत. त्यामध्ये बारटक्के दवाखान्यात जानेवारी ते डिसेंबर २०२१ दरम्यान १८ हजार ५०० रॅपिड चाचण्या केल्याची नाेंद आहे. त्यापैकी वारजे पाेलिसांनी रँडम पद्धतीने १६५ जणांना संपर्क करून चाैकशी केली असता त्याद्वारे धक्कादायक गाेष्टी उघडकीस आल्या आहेत. १६५ पैकी फक्त १८ जणांनी या केंद्रावर काेराेना चाचणी केल्याचे सांगितले. तर ३७ जणांचा संपर्क झालेला नाही व ९ जणांनी फाेन उचलला नाही यांची संख्या ६४ आहे. या ६४ जणांची चाचणी झाली असे गृहीत धरून पाेलिसांनी १६५ मधून ६४ वजा करता १०१ म्हणजेच ६१ टक्के नाेंदी पाेलिसांच्या तपासात बाेगस आढळल्याची नाेंद केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *