• July 30, 2023
  • No Comment

कामगार महिलांना काम देतो असे सांगुन लुटणा-या टोळीस केली अटक

    चार अनोळखी इसमांनी आमच्या सोबत कामासाठी चला असे सांगून रोडवर चालणा-या प्रवासी चार चाकी गाडीतून जुन्या कात्रज बोगदयाचे पलीकडे घेऊन जाऊन प्रवासी गाडीतुन उतरुन डोंगराकडे जाणारे कच्या रस्त्यावर घेऊन जाऊन फिर्यादी व त्यांचे सहकारी यांचे अंगावरील सोन्याचे दागिणे व मोबाईल हॅन्डसेट रोख रुपये असे ७६,०००/- रुपयांचे ऐवज जबरदस्तीने चोरुन नेले म्हणून फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्हयाचे तपासामध्ये सदरचा गुन्हा आरोपी नामे १) नितीन साहेबराव चव्हाण, वय ३० वर्षे, रा. कांबळे बाई यांच्या बिल्डींग मध्ये भाडयाने, सहयोग नगर, विठठलनगर, वारजे माळवाडी, पुणे मुळ रा. तामसा रोड, कृष्णानगर, गल्ली नंबर ५, ता. आर्धापुर, जि. नांदेड २) संतोष नागोराव कानोडे,वय २० वर्षे, रा. सदर मुळ रा. मारुती मंदिरा शेजारी, आहिल्यादेवीनगर, ता.
    आर्धापुर,जि.नांदेड ३)सुकलाल बाजीराव गिरी, वय १९ वर्षे, रा. सदर मुळ रा. तामसा रोड, कृष्णा नगर, गल्ली नंबर ५, ता. आर्धापुर, जि. नांदेड ४) सुनिल नारायण गिरी, वय १९ वर्षे, रा. सदर, मुळ रा. तामसा रोड, विवेकगर, कॅनल जवळ, ता. आर्धापुर, जि. नांदेड यांनी केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना नमुद गुन्हयामध्ये अटक करुन त्यांचे कडुन गुन्हयातील चोरी केले दोन सोन्याचे मंगळसुत्र, दोन जोड कानातील फुले असा एकुण ७६,०००/- रु.चा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदरची कारवाई मा अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री.प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ २, पुणे शहर श्रीमती स्मार्तना पाटील
    मा.सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री. नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री विजय कुंभार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीषकुमार दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस अंमलदार शैलेश साठे, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन सरपाले, चेतन गोरे, निलेश ढमढेरे, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, सचिन गाडे, धनाजी धोत्रे, अभिनय चौधरी, अशिष गायकवाड, राहुल
    तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *