• August 18, 2023
  • No Comment

फायनान्सची वाहने कमी किंमतीत देतो म्हणून युवकाची फसवणूक

फायनान्सची वाहने कमी किंमतीत देतो म्हणून युवकाची फसवणूक

    पुणे : फायनान्स बॅकेचा अधिकारी भासवुन जुन्या गाड्यांच्या विक्रीमध्ये १३ लाखाची युवकाची फसवणुक,अमिशाला अनेक युवक बळी,यापूर्वीही राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल.

    बॅकेने जप्त केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहने कमी किंमतीत घेऊन देतो असे सांगून हडपसर मधील युवकाची १३ लाख ३९००० रुपयांची फसवणूक केल्याने चार जणांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुणे शहर गुन्हे शाखा युनिट सहा ने याविषयी तपास केला आहे.प्रफुल्ल उबाळे(रा. हडपसर, पुणे), कमल उबाळे(रा. हडपसर, पुणे), अविनाश कदम(रा. हडपसर, पुणे), सुभाष रसाळ(रा.हडपसर, पुणे) या चौघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अनिरुद्ध शरद राऊत(रा. भागीरथी नगर, साडेसतरा नळी, हडपसर)यांनी तक्रार दिली आहे. हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी अनिरुद्ध राऊत हा हडपसर येथे शिक्षण घेत आहे.त्याला स्वतःच्या वापरासाठी एक दुचाकी लागत असल्याने त्याने याबाबत त्याचा मिञ दीपक आंधळे यास विचारणा केली. त्यावेळी दीपक आंधळे याने त्यास प्रफुल उबाळे यांचा गाड्या विकण्याचा व्यवसाय आहे त्यांची मी ओळख करून देतो म्हणून भेट करून दिली. त्यावेळी उबाळे यांनी राऊतला मी श्रीराम फायनान्स व इतर फायनान्सचे काम करतो आणि मी तुला या गाड्यांच्या विक्रीच्या व्यवसायात भरपूर पैसे कमवून देईल असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर उबाळे यांनी मुंढवा येथील एका फायनान्सच्या गोडाऊनमध्ये नेऊन काही गाड्या दाखवल्या आणि सांगितले की या गाड्या आयसीआयसीआय बँकेने जप्त केलेले गाड्या असून या गाड्या फक्त माझ्या मार्फत विकल्या जातात व गाडी खरेदी केल्यानंतर एक महिन्यानंतर गाडीची कागदपत्रे मिळतात. उबाळेच्या बोलण्यावर विश्वास पटल्याने राऊतने त्याला दुचाकीची मागणी केली. उबाळे याने ६५ हजार बाजारभाव असलेली एक दुचाकी ३२ हजार रुपयांना दिल्याने राऊतचा उबाळेवर विश्वास निर्माण झाला.त्यानंतर उबाळे हा वेळोवेळी आलिशान गाड्यातून राऊत यास भेटू लागला आणि या गाड्यांच्या व्यवसायातून किती पैसे कमवतो हे सांगत होता.या सर्व गोष्टींवर विश्वास घातल्यामुळे राऊतने त्याच्याकडून एक चारचाकी व सहा दुचाकी इतकी वाहने घेतली उद्या सर्व गाड्यांची पैसे ऑनलाईन स्वरूपात दिले.त्यानंतर उबाळे यांनी व्हाट्सअप वर त्यांना काही गाड्यांची माहिती व फोटो पाठवले त्यांच्या किमती बाजार किमतीपेक्षा कमी असल्याने राऊतने उबाळे यांना कॅश व ऑनलाइन स्वरूपात १३ लाख ३९ हजार रुपये दिले. परंतु ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे उबाळेंनी टाळाटाळ करण्यास सुरवात केल्याने राऊत यांनी त्यांना भेटून गाडी व पूर्वीच्या वाहनांची कागदपत्रे मागणी केली असता उबाळे यांचा ड्रायव्हर अविनाश कदम याने राऊतला आमचा मालक मोठा माणूस आहे त्याच्या नादी लागू नको त्याचा पार्टनर सुभाष रसाळ आहे. तुझ्यासारखी किती पोर आली आणि गेली त्यांना काही फरक पडत नाही तसेच त्यांची आई कमल उबाळे ही एका संघटनेची अध्यक्ष आहे अश्या स्वरूपाच्या धमक्या दिल्याने राऊत याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

    या टोळीवर राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखलआहेत.सराईतांकडुन आणखी कोणाची फसवणुक झाली असेल तर गुन्हे शाखा युनीट सहा संगे संपर्क साधावा.राज्यातील अनेक युवकांना गंडा घालुन मिळालेल्या पैशाचे नक्की काय होते.या प्रकरणात आणखी कोणाचा वरदहस्त आहे? हे पाहणे औचित्याचे ठरेल

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *