• July 30, 2023
  • No Comment

सन २०१६ पासुन विनयभंगाच्या गुन्ह्यात सुमारे ७ वर्षापासुन फरार असलेला गुन्हेगार केला जेरबंद

सन २०१६ पासुन विनयभंगाच्या गुन्ह्यात सुमारे ७ वर्षापासुन फरार असलेला गुन्हेगार केला जेरबंद

    नागपुर चाळ येरवडा पुणे येथे एका महिलेस कार्यक्रमामध्ये नाचत असताना धक्का मारुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्या बाबत जसप्रितसिंग गुरुचरणसिंग बाला व अजय उर्फ बाटल्या संतोष कांबळे, रा ६११, कासेवाडी, भवानीपेठ, श्रीगणेश मित्र मंडळाशेजारी, पुणे यांचे विरुध्द येरवडा पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्यात आरोपी अजय उर्फ बाटल्या संतोष कांबळे हा गुन्हा दाखल झाले पासुन सुमारे ०७ वर्षापासुन फरार होता त्यास पुणे शहर आयुक्तालयाने पाहिजे आरोपी म्हणुन घोषित केले होते.
    युनिट १, गुन्हे शाखा पुणे शहर यांचे कडीलपोलीसअधिकारी व स्टाफ असेयुनिट-१ च्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार व अभिनव लडकत यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्हयांत ७ वर्षापासुन फरार असलेला आरोपी नामे अजय उर्फ बाटल्या संतोष कांबळे हा त्याच्या राहते घरी आला आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदरची बातमी
    वपोनि शब्बीर सय्यद कळविली असता त्यांनी लागलीच सपोनि आशिष कवठेकर व अंमलदार यांची टीम तयार करुन त्यांना सुचना व मार्गदर्शन करून बातमीचे ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार युनिट-१ चे अधिकारी व अंमलदार यांनी बातमीचे ठिकाणी जावुन छापा टाकुन नमुद आरोपीस ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव अजय उर्फ बाटल्या संतोष कांबळे, वय २५ वर्षे रा ६११,कासेवाडी,भवानीपेठ, श्रीगणेश मित्र मंडळाशेजारी, पुणे असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे येरवडा
    पोलीस स्टेशनकडील वरील दाखल गुन्हयाचे अनुषंगाने त्यास विश्वासात घेवुन तपास करता त्याने दाखल गुन्हा केला असल्याचे कबुल केले तसेच येरवडा पोलीस ठाणेस सदर बाबत संपर्क करुन खात्री केला असता सदरचा आरोपीत हा सन २०१६ मध्ये विधीसंघर्षित बालक असताना त्याने सदरचा गुन्हा केल्याचे व तो एम
    ओ बी लिस्टमधील अ क्र. १६४५ व येरवडा पो स्टे कडील पाहिजे आरोपी लिस्ट मध्ये अ. क्र. १४३ वर त्याचे नाव नमुद असल्याची माहिती प्राप्त झाल्याने आरोपीस पुढील कारवाई कामी येरवडा पोलीस स्टेशन, पुणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *