• July 29, 2023
  • No Comment

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ ची कारवाई

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ ची कारवाई

    पुणे : दि.२७ दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, गुन्हे शाखा , पुणे शहर कडील अधिकारी व अंमलदार असे वाहनचोरीवर आळा घालण्यासाठी कारवाईचे अनुषंगाने हडपसर पो.स्टे. हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार राहुल इंगळे, संदीप येळे, विक्रांत सासवडकर यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की श्री. लक्ष्मी इन्क्लेव्ह सोसायटीचे गेट जवळ, जुन्या कॅनॉल शेजारील रोडवर, माळवाडी, हडपसर, पुणे येथे एका बिगर नंबर प्लेट गाडीवर तीन इसम कोणाची तरी वाट पाहत बसलेला आहे. त्याचेकडे असलेली गाडी ही चोरीची आहे. वगैरे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने लागलीच सदरची बातमी आम्ही पथकाचे प्रमुख यांना कळविली असता त्यांनी दिलेल्या सूचना प्रमाणे आम्ही स्टाफच्या मदतीने सापळा रचून सदर संशयित इसमास लागलीच ताब्यात घेतले व त्याला त्याचे नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव 1) अक्षय सुरेश मगर वय २३ वर्ष रा साई सत्यम पार्क, कावडे वस्ती, वाघोली पुणे 2) प्रविन आत्माराम बुरकुल वय १९ वर्ष रा भाडाळे वस्ती वाघोली पुणे 3) शुभम मोहन चव्हाण वय २३ वर्ष रा शिंदे वस्ती लोणीकंद, पुणे असे सांगितले. त्याचे ताब्यात असलेली यमाहा rx100 गाडी बाबत चौकशी करता त्यांनी सदर गाडी हडपसर येथून चोरी केल्याचे सांगितल्याने सदर गाडी पंचनाम्याने जप्त केली आहे.

    आरोपीकडून खालील प्रमाणे एकूण 04 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत
    1) हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं १०६८/२०२३, कलम ३७९ (यामाहा)
    2) मार्केटयार्ड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं १७३/२०२३ कलम ३७९(यामाहा)
    3) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं २७८/२०२३ कलम ३७९(यामाहा)
    4) भारती विद्यापीठ येथे गुन्हा दाखल करणेची तजवीज ठेवली आहे (यामाहा)
    आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईकामी हडपसर पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आलेसदर कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री.रामनाथ पोकळे सो , मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे सो, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. सतीश गोवेकर सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांचे मार्गदर्शना खाली सहा पोलीस निरीक्षक विवेक पाडवी, पोलीस अंमलदार उदय काळभोर, अशोक आटोळे, दिनकर लोखंडे, गणेश लोखंडे, शिवा जाधव, दत्तात्रे खरपुढे, सुदेश सपकाळ, राहुल इंगळे, विक्रांत सासवडकर, संदीप येळे, अमोल सरतापे, विनायक येवले यांनी केली आहे

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *