• July 29, 2023
  • No Comment

भूलतज्ज्ञ असलेला डॉक्टर, अनेक भाषांचे ज्ञान पण निघाला ‘इसिस’ समर्थक, NIA कडून अटक

भूलतज्ज्ञ असलेला डॉक्टर, अनेक भाषांचे ज्ञान पण निघाला ‘इसिस’ समर्थक, NIA कडून अटक

    पुणे : पुणे शहरात राष्ट्रीय तपास संस्थेने गुरुवारी छापा टाकला. या छाप्यात मोठी कारवाई करण्यात आली. एका डॉक्टरास अटक केली आहे. यापूर्वी पुणे शहरात १८ जुलै रोजी दोन जणांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्या दोघांचा संबंध जयपूर बॉम्ब ब्लॉस्ट प्रकरणाशी होता. एनआयएच्या मोस्ट वॉटेंडच्या यादीत ते होते. महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी अशी या दोघांची नावे आहे. त्यांचा एटीएस तपास करत आहे. त्यानंतर आता राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) एका डॉक्टरास अटक केली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

    कोण आहे तो डॉक्टर
    राष्ट्रीय तपास संस्था महाराष्ट्रातील ISIS नेटवर्कचा तपास करत आहे. या प्रकरणात यापूर्वी चार जणांना अटक केली आहे. आता गुरुवारी पुणे शहरातून राज्यातील पाचवी अटक झाली आहे. पुण्यातून डॉ.अदनान अली सरकारला अटक केली आहे. कोंढवा परिसरात राहणारा हा डॉक्टर भूलतज्ज्ञ आहे. ४३ वर्षीय या डॉक्टरास १६ वर्षांचा अनुभव आहे. त्याच्या घराची तपासणी केल्यावर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, दहशतवादी संघटना ISIS शी संबंधित अनेक कागदपत्रे आणि इतर अनेक आक्षेपार्ह साहित्य सापडले आहे. ते सील करण्यात आले.

    बीजेमधून केले MBBS
    डॉक्टर अदनान अली सरकार याने 2001 मध्ये पुण्यातील बीजे शासकीय महाविद्यालयातून MBBS केले. त्यानंतर 2006 मध्ये MD एनेस्थीसिया (भूलतज्ज्ञ) केले. ISIS समर्थक असलेला डॉ अदनान याला इंग्रजी, हिंदी, मराठी, आणि जर्मन भाषेचे ज्ञान आहे. अनेक पुस्तकांमध्ये त्याने लिखाण केले आहे

    एनआयएकडून महाराष्ट्रातील ISIS नेटवर्कचा तपास प्रकरणात 28 जून रोजी पहिला गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात 3 जुन रोजी मुंबईमधून तिघांना तर पुण्यातून एकाला अटक केली होती. आता डॉ.सरकारच्या माध्यमातून पुण्यातून अटक झालेला दुसरा व्यक्ती आहे

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *