• July 29, 2023
  • No Comment

लोणीकंद पोलीसांनी घरफोडीचा गुन्हा उघड करुन ७ लाखांची मालमत्ता केली हस्तगत

लोणीकंद पोलीसांनी घरफोडीचा गुन्हा उघड करुन ७ लाखांची मालमत्ता केली हस्तगत

    लोणीकंद पोलीस ठाणे हददीतील वाडेबोल्हाई येथे राहणारे फिर्यादी यांचे राहते घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडुन फिर्यादीचे १३ तोळे सोन्याचे दागिन्यांची दिवसा घरफोडी केली म्हणुन
    लोणीकंद पोलीस स्टेशन येथे अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. नमुद गुन्हयातील फिर्यादीची परिस्थिती अंत्यत हलाखीची असल्याने व चोरीस गेलेली मालमत्तेमुळे त्यांना
    बसलेला प्रचंड मानसिक धक्का पाहुन लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विश्वजित काईंगडे यांनी तात्काळ तपासी पथक अधिकारी सपोनि गोडसे, सपोनि जाधव यांचे नेतृत्वाखाली दोन तपास पथके तयार करुन सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरीता सुचना दिल्या. त्यानुसार सदर गुन्हयाच्या तपासाचे अनुषंगाने दोन्ही पथके शिक्रापुर व दौंड भागात रवाना झाले. परंतु आत्यंतिक परिश्रम करुनही काहीही हाती आले नाही. त्यानंतर मागील काळात जेलमधुन सुटलेल्या आरोपीं विषयी माहीती घेण्याचे काम सुरु करण्यात आले. सदरची माहीती घेत असताना तपास पथकातील पोलीस शिपाई साईनाथ रोकडे, सचिन चव्हाण, दिपक कोकरे यांनी जेल रिलीज झालेल्या आरोपींची माहीती घेतली परंतु त्या काळात कोणी लोणीकंद परीसरात आल्याची खात्रीशिर माहीती मिळाली नाही. तरीही खचुन न जाता दोन्ही पथकाने आपले काम चालुच ठेवले. त्यानंतर सपोनि श्री रविंद्र गोडसे, पोलीस हवालदार सकाटे, पोलीस शिपाई साईनाथ रोकडे, सचिन चव्हाण, दिपक कोकरे यांना माहीती मिळाली की, पिंपरी परिसरातील एक दिवसा घरफोडया करणारा आरोपी नुकताच सुटला आहे. त्यानुसार त्याच्या हालचाली विषयी गोपनीय खबऱ्याकडून माहीती घेतली असता तो लोणीकंद
    परीसरात येवुन गेल्याचे समजले. त्यावरुन सदर आरोपीचा ठाव ठिकाणाची माहीती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला परंतु
    तो त्याचे घरी राहत नव्हता व त्याचा नक्की असा ठाव-ठिकाणा नव्हता. त्यामुळे त्याला पकडणे जिकरीचे झाले होते.
    परंतु त्याचे जुने राहण्याचे अड्डे व त्याचेवर नाराज असलेले दुश्मन यांचेकडे त्याचेविषयी माहीती मिळवुन त्याला शिताफीने नमुद गुन्हयात अटक करण्यात आली. सुरवातीला त्याने सदरचे गुन्हयाविषयी काहीही माहीती दिली नव्हती परंतु पोलीस भाषेत त्याला विचारणा केल्यावर त्याने सदर घरफोडी केल्याची कबुली दिली व साथीदारांची नावे सांगीतली व सदर गुन्हयातील सोने त्याने कशा पध्दतीने खपविले या विषयी माहीती दिली. त्यानुसार सपोनि
    श्री.गोडसे व त्यांचे पथकाने पुढिल तपास करीत आणखी एका आरोपीस अटक केले असुन चोरीस गेलेल्या संपुर्ण
    सोन्याची लगड तपासकामी जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपींची तब्बल ०८ दिवस पोलीस कस्टडी घेण्यात
    आली असुन गुन्हयात चोरीस गेलेल्या सोन्याचे दागिन्यांची आरोपीकडुन १३ तोळे सोन्याची लगड असा एकुण ७ लाख
    रुपये किंमतीची मालमत्ता हस्तगत करण्यात आली असून लवकरच मा. न्यायालयाचे आदेशाने फिर्यादी यांना नमुद
    मालमत्ता देण्यात येणार आहे. सदर गुन्हयाचा पुढिल तपास सपोनि गोडसे करीत आहेत.


    सदरची कामगिरी मा. श्री. रंजनकुमार शर्मा सो, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर,
    मा. श्री. शशीकांत बोराटे साो, पोलीस उपआयुक्त सो परिमंडळ ४, पुणे शहर, मा. श्री. संजय पाटील साो, सहा.
    पोलीस आयुक्त साो, येरवडा विभाग, पुणे शहर, यांचे मार्गदर्शना खाली श्री. विश्वजीत काइंगडे सो, वरिष्ठ पोलीस
    निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर, श्री. मारुती पाटील सो, पोलीस निरीक्षक (गुन्हे), लोणीकंद पोलीस
    ठाणे, पुणे शहर, तपास पथकाचे सपोनि रविंद्र गोडसे, पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, पोलीस नाईक विनायक
    साळवे, सागर जगताप, पोलीस शिपाई साईनाथ रोकडे, सचिन चव्हाण, दिपक कोकरे, पांडुरंग माने, मल्हारी सपुरे,
    शुभम चिनके, आशिष लोहार, गणेश डोंगरे, महिला पोलीस शिपाई प्रतिक्षा पानसरे लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर
    यांनी केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *