• July 29, 2023
  • No Comment

वाघोलीतील बेकायदेशीर गावठी दारु विकणाऱ्याची ०१ वर्षासाठी कारागृहात रवानगी

वाघोलीतील बेकायदेशीर गावठी दारु विकणाऱ्याची ०१ वर्षासाठी कारागृहात रवानगी

    लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत गावठी दारुचे अड्डे पुर्णपणे उध्दवस्त करुन गावठी हातभट्टी दारुच्या भट्टया पुर्णपणे नाहीशा करुन गावठी दारुची निर्मिती विक्री व वाहतुक या सर्वांवर पायबंद
    घालण्यासाठी लोणीकंद पोलीसांनी मागील ०१ महीन्यापासुन कारवाई सुरु केली आहे. यामध्ये भावडी गाव येथील भट्टीवर छापा कारवाई करुन ०२ इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यांची प्रत्येकी ०३ दिवसांची पोलीस कोठडी घेतली होती, यापुढेही अशाच प्रकारे कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान
    केवळ छापे टाकत न बसता अशा प्रकारे बेकायदेशिर गावठी हातभट्टीची निर्मिती विक्री व वाहतुक करणाऱ्या इसमांवर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ति व दृकश्राव्य कलाकृतीची विना परवाना प्रदर्शन करणारे व्यक्ति (व्हिडीओ पायरेटस) यांच्या विघातक कृत्यास
    आळा घालण्याबाबतचा अधिनियम ( एम. पी. डी. ए.) या कायद्यान्वये कारवाई करुन सदर इसमांवर अंकुश ठेवण्यात येईल. लोणीकंद पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील बेकायदेशीर गावठी दारु विकणारा आरोपी गुरुनाथ ऊर्फ महेश जालिंदर कांबळे वय ३२ वर्षे, रा. एस. टी. कॉलनी वाघोली ता. हवेली जि. पुणे याचेवर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ति व दृकश्राव्य कलाकृतीची विना परवाना प्रदर्शन करणारे व्यक्ति (व्हिडीओ पायरेटस) यांच्या विघातक कृत्यास
    आळा घालण्याबाबतचा अधिनियम ( एम. पी. डी.ए.) अन्वये प्रस्ताव सादर करण्यात आला होता, मा. श्री. रितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनकडील प्रस्ताव मान्य करुन
    एम.पी.डी.ए. कायद्यान्वये इसम नामे गुरुनाथ ऊर्फ महेश जालिंदर कांबळे यास एक वर्षासाठी नागपुर मध्यवर्ती कारागृह नागपुर येथे स्थानबध्द आदेश काढले असुन सदर इसमास दि. २६/०७/२०२३ रोजी नागपुर मध्यवर्ती कारागृह येथे ०१ वर्षासाठी स्थानबध्द करण्यात आले आहे. यापुढेही हातभट्टी दारु निर्मिती
    व विक्री करणाऱ्या तसेच वाहतुक करणाऱ्या इसमांवर यापुढेही अशाच प्रकारे कारवाई करण्यात येणार असल्याचे लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विश्वजीत काइंगडे यांनी सांगितले आहे. सदर स्थानबध्दतेचा प्रस्ताव मा. सह पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त साो. श्री. रंजन कुमार शर्मा, मा. पोलीस उप आयुक्त साो. श्री. शशिकांत बोराटे, मा. सहा. पोलीस आयुक्त साो. श्री. संजय पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. मारुती पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सौ. सिमा ढाकणे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस नाईक प्रशांत कापुरे, सागर कडु यांनी अत्यंत परिश्रम पुर्वक तयार केला आहे.हातभट्टी दारुची निर्मिती, विक्री व वाहतुक संदर्भात काही माहीती मिळाल्यास लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर संपर्क क्रमांक ९५२७०६९१०० यावर कळविण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विश्वजीत काइंगडे यांनी केले आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *