• July 28, 2023
  • No Comment

इंस्टाग्रामवरील मैत्री पडली महागात! अल्पवयीन मुलीशी मैत्री करुन तिला भेटण्यासाठी बोलावून तिच्यावर अत्याचार

    डोंबिवलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या परिसरात एका तरुणाने इंस्टाग्रामवर अल्पवयीन मुलीशी मैत्री करुन तिला भेटण्यासाठी बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून काशिनाथ पाटील या तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत

    याबाबत अधिक माहिती अशी की, डोंबिवलीत राहणाऱ्या आरोपी काशिनाथ पाटील याने इंस्टाग्रामवर एका अल्पवयीन मुलीची ओळख वाढवली. त्याने मुलीला आपल्या जाळ्यात ओढत डोंबिवली पश्चिम येथे भेटण्यास बोलवले आणि संधीचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केले.

    दुपारी गेलेली मुलगी परत घरी परतली नाही म्हणून मुलीच्या कुटूंबियांनी २५ जुलै रोजी ती हरवल्याची तक्रार टिळकनगर पोलीस ठाण्यात केली. यासंदर्भात पोलीस स्टेशनच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस अधिकारी एम.पी. मुंजाळ यांच्या पथकाने तपास सुरू केला.

    तपासा दरम्यान, आरोपी काशिनाथ पाटील याला डोंबिवली पश्चिमेतून अटक केली. २९ वर्षीय आरोपी काशिनाथ पाटील हा डोंबिवली पूर्वेत राहणारा असून याच्या विरोधात टिळकनगर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *