• July 28, 2023
  • No Comment

हडपसर, तसेच वानवडी भागातील गुन्हेगारांना चाप एकाचवेळी ६५ गुंड हद्दपार

हडपसर, तसेच वानवडी भागातील गुन्हेगारांना चाप एकाचवेळी ६५ गुंड हद्दपार

    पुणे : हडपसर, तसेच वानवडी भागातील गुन्हेगारांना चाप बसविण्यासाठी पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी या भागातील ६५ गुंडांना पुणे शहर, जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले. एकाचवेळी ६५ गुंडांना हद्दपार करण्यात आल्याने गुंडांना जरब बसणार आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयु्क्त संदीप कर्णिक यांनी गुंडांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

    हडपसर, वानवडी भागातील विविध पाेलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगारांची माहिती संकलित करण्यात आली. सराइतांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये (हद्दपार) कारवाई करण्यात आली. गुंडांना पुणे शहर, जिल्हा, तसेच पिंपरी-चिंचवड शहरातून हद्दपार करण्यात आले आहे. परिमंडळ पाचचे पोलीस उपायु्क्त विक्रांत देशमुख, सहायक आयुक्त शाहूराजे साळवे, अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण काळे, आश्लेषा माने आदींनी ही कारवाई केली.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *