• May 17, 2023
  • No Comment

अनेक गंभिर गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपीस अटक

    हडपसर पोलीस स्टेशन रेकॉर्डवरिल आरोपी ज्याच्यावर दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबरी दुखापत, विनयभंगअशा प्रकारचे अनेक गंभिर गुन्हयांमध्ये पाहीजे असलेला आरोपी आशिष मारुती धणके वय २४ वर्षे, रा. हरपळेवस्ती, फुरसुंगी, पुणे हा फरार झालेला होता. त्यास वेळोवेळी पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो मिळून येत नव्हता. पोलीस अंमलदार अजित मदने आणि चंद्रकांत रेजीतवाड यांना गोपनीय माहीती मिळाली की, आरोपी हा सध्या लोहारा, धाराशिव या भागात आहे. पोलीस अंमलदार समिर पांडुळे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड आणि कुंडलीक केसकर यांची टिम सदर भागत जावून आरोपीचा शोध घेत असतना आरोपी हा अण्णुर ता. आळंद जिल्हा कर्नाटक येथे गेला असल्याची माहीती मिळाली. मिळालेल्या माहीतीचे आधारे

    आरोपी  आशिष मारुती धणके, वय २४ वर्षे, रा. हरपळे वस्ती, फुरसुंगी, पुणे यास ताब्यात घेण्यात आले.दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक सुशील डमरे, हडपसर पोलीस ठाणे पुणे शहर हे करीत आहेत.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *