- May 17, 2023
- No Comment
नैसर्गिक मत्यूचा बनाव केलेला खून उघडकीस

ससुन हॉस्पीटल पुणे येथून हडपसर पोलीस स्टेशनला एमएलसी कळविण्यात आले. त्यामध्ये मयत रवी सुर्यभान क्षिरसागर वय ५१ वर्ष रा. मांजरी पुणे यास दारूचे व्यसन होते ते घरी बेशुध्द अवस्थेत मिळून आल्याने त्यांना उपचार कामी ससुन हॉस्पीटल येथे आणले असता उपचारपुर्वी डॉक्टरांनी मयत घोषीत केले. मयताचे इनक्वेस्ट पंचनाम्यामध्ये गळ्याजवळ व्रण व पाठीवर मारल्याचे व्रणदिसून आले. डॉक्टरांनी मयताचा गळा दाबलेला व त्याचेवर व्रण असलेले अॅडव्हांन्स सर्टीफिकेट दिले.

गुन्ह्याचे तपासात अरविंद गोकुळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन, विश्वास डगळे, पोनि. (गुन्हे), हडपसर पोलीस स्टेशन, तपासपथक प्रभारी अधिकारी सपोनिरी विजयकुमार शिंदे, पोउपनिरी. अविनाश शिंदे आणि सपोनिरी. नानासाहेब जाधव यांनी नियोजन करून मयातचे घरातील लोकांनी धार्मिक विधी उरकल्यानंतर फिर्यादी यांचे घरातील इसमांची चौकशी करीत असताना, मुलगा नामे ओंकार रवि क्षीरसागर वय २७ वर्षे हा वेळोवेळी वेगवेगळी माहीती देत असल्याने त्यास पोलीस ठाणेस
घेवून त्याचेकडे अधिक तपास करता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपी मुलगा याने सांगीतले की, मयत वडील यांनी त्यास शिवीगाळ केल्याचा राग मनात धरुन काठीने मारहाण करुन गळा दाबून त्याचा खुन केल्याचे सांगीतले. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक निरीक्षक नानासाहेब जाधव, हडपसर पोलीस ठाणे पुणे शहर हे करीत आहेत.




