- May 17, 2023
- No Comment
ज्वेलर्स चे हातचलखीने चोरलेले सोने जप्त

लक्ष्मी ज्वलेर्स नावाचे भेकराईनगर हडपसर पुणे येथे दुकान असून त्यांचे दुकानात तीन महिला व त्यांचेसोबत एक लहान मुलगी येवुन दुकानातील कामगारांना वेगवेगळ्या सोन्याच्या वस्तु दाखवण्यास सांगून त्यांची नजर चुकवून सोन्याचे नाकातील चमकी वजन १२ ग्रॅम हे हातचलाखीने चोरून नेल्याने हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल क रण्यात आला होता.

दुकानात सीसीटीव्ही फुटेज असल्याने तपासपथक अधिकारी विजयकुमार शिंदे, अविनाश शिंदे, अंमलदार शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, अतुल पंधरकर यांनी सीसीटीव्ही पाहीले.त्यामध्ये ३ महिला व त्यांचे सोबत लहान मुलगी दिसली. सीसीटीव्ही मधून दुकानातील आरशामध्ये लहान
मुलीने दागिने हातचलाखीने चोरून जिन्स पँन्टमध्ये लपवत असलेबाबत दिसून आले. सीसीटीव्ही पडताळणी करीत असताना मिळालेले फुटेज व आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेज आधारे आरोपी महिला या रिक्षातुन बसून गेलेल्या दिसल्या. तपासपथक टिमने सुमारे ५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज हडपसर ते पदमावती सहकारनगर दरम्यान चेक करून आरोपी महिला निष्पन्न करून १) सविता मनोज चव्हाण वय ४७ वर्षे, रा.शिवरामदादा तालीमजवळ, ५० गणेश पेठ पुणे. २) वर्षा योगेश चव्हाण रा. शनि मंदिराशेजारी चव्हाणनगर
पुणे. ३) स्नेहा शैलेंद्र पवार वय २५ वर्षे रा. चाळ नं. ३, कृष्णानगर महम्मंदवाडी पुणे. ४) विधीसंघर्षग्रस्त मुलगी यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे केले तपासात त्यांनी दाखल गुन्हा केल्याचे कबुली दिली. आरोपी महिलांकडून सोन्याचे नाकातील चमकी वजन १२ ग्रॅम किं. रू ४५,०००/- चे हस्तगत करण्यात आले आहे.दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, हडपसर पोलीस ठाणे हे करीत आहेत.




