- May 17, 2023
- No Comment
रोडवरील पार्क केलेल्या गाडया चोरी करणारा सराईताला केले अटक

टाटा कंपनीचा टेम्पो एम. एच. ३२ बी ४६०५ हा चोरीस गेला होता. सदर गुन्हा करणा-या अज्ञात आरोपी यांचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदिप भोसले यांनी सुचना दिल्या होत्या.सदर आरोपी याचा शोध तपासपथक अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, व स्टाफ असे गुप्त बातमीदारामार्फतीने व घटनास्थळाच्या आजुबाजुस सीसीटिव्हिी फुटेज मध्ये आरोपी हा गाडी चोरी करताना दिसत आहे का? यादृष्टीने शोध घेत होते. यापुर्वी कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत मधील गुन्हयातील टेम्पो व इतर गाडया हया आरोपी ईस्माईल शफी सय्यद, वय ४४ वर्षे, रा.लक्ष्मीनगर, गल्ली नं.०४, कोंढवा बुा पुणे याने चोरी केलेल्या होत्या.

त्यामुळे दाखल गुन्हयातील टेम्पो ही ईस्माईल शफी सय्यद याने चोरी केला असल्याबाबत संशय होता. त्याअनुषंगाने गुप्त बातमीदारामार्फतीने आरोपी याच्याबाबत माहिती घेत असताना दाखल गुन्हयात चोरी
केलेला टाटा कंपनीचा टेम्पो एलपीटी ९०९ तीचा आरटिओ क्रं. एम. एच. ३२ बी ४६०५ हा आरोपी ईस्माईल शफी सय्यद, वय ४४ वर्षे, रा. लक्ष्मीनगर, गल्ली नं. ०४, कोंढवा बुग पुणे हा विकण्यासाठी ग्राहक शोधत असल्याबाबत माहिती पोलीस अंमलदार सुहास मोरे, व राहुल थोरात यांना गुप्त बातमी मिळाली होती. आरोपी याचा शोध घेवुन त्यास पकडुन अटक करुन त्याची मा. न्यायालयाकडुन पोलीस कस्टडी घेवुन सखोल तपास करुन त्याच्याकडुन १ ) टेम्पो क्रं. एम. एच. ३२ बी ४६०५ २) पल्सर मोटार सायकल एम.एच.१२ क्यु.
व्हि.४५२४, ३)ॲटिव्हा ५ जी मोटार सायकल एम. एच. १२ क्यु. यु. ११४८, ४) रिक्षा क्र एम. एच. १२ क्यु. ई.७६९६,५)युनिकॉन एम. एच. १२ पी. एफ. ८३१० हया गाडया चोरी करुन पोलीसांनी पकडु नये म्हणुन वेगवेगळया ठिकाणी सोडुन दिल्याचे सांगितले.
आरोपी यांच्याकडुन ५ लाखाच्या गाडया जप्त करण्यात आल्या आहेत. सदर आरोपी याने मागिल वर्षीही कोंढवा पोलीस ठाणेच्या हद्दीतुन ५ गाडया चोरी केल्याचे उघड झाले होते.




