- September 9, 2023
- No Comment
पुण्यात ड्रग्ज आणि पॉपी पावडरसारखे अतिशय घातक अमली पदार्थ विकणाऱ्यांना बेड्या
पुणे : शिक्षणाचं माहेरघर सध्या ड्रग्जच्या विळख्यात सापडल्याचं दिसत आहे. मागील काही महिन्यांपासून ड्रग्ज पुरवण्याऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. त्यांनी धडाधड कारवायादेखील सुरु केल्या आहेत. त्यातच पिंपरी- चिंचवड शहरातील हिंजवडी आयटी सिटी परिसरात एमडी ड्रग्ज आणि पॉपी पावडरसारखे अतिशय घातक अमली पदार्थ विकणाऱ्या दोन राजस्थानी पेडलरला अमली पदार्थ विरोधी पोलीस पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या दोन्ही ड्रग्स पेडलर कडून पिंपरी- चिंचवड शहर पोलिसाच्या अमली पदार्थ विरोधी पोलिस पथकाने जवळपास 1 किलो 750 ग्रॅम अफूचा चुरा आणि 61 ग्रॅम एम डी ड्रग्स जप्त केल आहे
हिंजवडी आयटी सिटी परिसरामध्ये दोन ड्रग्स पेडलर हे आयटी अभियंता तरुण-तरुणींना अमली पदार्थ विक्री करण्यासाठीं येणार आहेत, अशी गोपनीय माहिती अंमली पदार्थ विरोधी पोलीस पथकाला मिळाली होती. त्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा लावून अमली पदार्थ विरोधी पोलिसांनी रवीप्रकाश सुखराम बिश्नोई आणि सुरेशकुमार साईराम बिश्नोई या दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.