• September 10, 2023
  • No Comment

कोपर्डी प्रकरणातील आरोपी जिंतेद्र शिंदेची कारागृहात आत्महत्या

कोपर्डी प्रकरणातील आरोपी जिंतेद्र शिंदेची कारागृहात आत्महत्या

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला होता. याप्रकरणातील आरोपी पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. यातील जितेंद्र शिंदे या आरोपीनं कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पहाटेच्या सुमारास पोलीस कर्मचारी गस्तीवर गेले असताना जितेंद्र शिंदेनं आत्महत्या केल्याचं समोर आलं.

अहमदनगर येथील कोपर्डीत १३ जुलै २०१६ रोजी एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली होती. या खूनप्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदे हा येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. आज ( १० सप्टेंबर ) कारागृहात गस्तीवर असलेल्या कर्मचाऱ्याला जितेंद्र शिंदे हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला
त्यानंतर जितेंद्र शिंदेला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, डॉक्टरांनी जितेंद्र शिंदे याला मृत घोषित केलं. शिंदेनं कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली? हे अद्याप समजू शकलं नाही

Related post

मित्राची चेस्टा का केली असे म्हणून डोक्यात कोयत्याने वार करुन तरुणाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

मित्राची चेस्टा का केली असे म्हणून डोक्यात कोयत्याने वार…

पिंपरी : मित्रासोबत चेस्टा मस्करी करीत असताना मित्राची चेस्टा का केली असे म्हणून डोक्यात कोयत्याने वार करुन तरुणाला जीवे ठार मारण्याचा…
स्पाच्या नावाखाली मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय एनआयबीएम रोडवरील आयरिन स्पावर छापा मॅनेजर व स्पा मालकाला अटक

स्पाच्या नावाखाली मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय एनआयबीएम रोडवरील आयरिन…

पुणे : स्पाच्या नावाखाली मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याचा भंडाफोड अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने केला आहे.…
वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून अल्पवयीन मुलीकडे  शरिर सुखाची मागणी केल्याची घटना समोर २२ वर्षाच्या तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून अल्पवयीन मुलीकडे शरिर सुखाची मागणी केल्याची…

पुणे: वाढदिवसानिमित्त अल्पवयीन मुलीला घरी नेण्याचा बहाणाकरून अज्ञात ठिकाणी नेहून बड्डे गिफ्ट म्हणून शरीरसुखाची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. परंतु…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *