- December 12, 2022
- No Comment
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेक हल्ल्याचा भाजपच्या वतीने निषेध
पुणे: पुणे जिल्हा पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील झालेल्या शाईफेक हल्ल्याचा पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टी (भाजप) वतीने निषेध करण्यात आला.
पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टी (भाजप) यांच्या वतीने निषेध सभा आज रविवार, 11 डिसेंबर संध्याकाळी शहर भाजप कार्यालयाबाहेर करण्यात आली.
यावेळेस पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टी (भाजप) अध्यक्ष व भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली ही निषेध सभा घेण्यात आली.
यावेळेस भाजपचे शहरातील माजी महापौर व नगरसेवक तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.