- January 11, 2024
- No Comment
वाहन चोरी मधील सराईत आरोपीत जेरबंद त्याचेकडुन एकुण ०४ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट-६ ची कारवाई
गुन्हे शाखा युनिट-६ कडील पोलीस अंमलदार हे युनिटचे हद्दीत
पेट्रोलिंग करित असताना, युनिट कडील पोलीस अंमलदार, सकटे व मुंढे यांना खात्रीशीर बातमी मिळाली की, इसम स्वप्नील व्हणमाने याचेकडे चोरीची वाहन असुन, तो सासवड रोड रेल्वे स्टेशन जवळ काळेपडळ, हडपसर येथे सार्वजनिक रोडवर उभा आहे अशी माहिती मिळाली.
सदर बातमीचे अनुशंगाने वरिष्ठांचे सूचनेप्रमाणे तात्काळ युनिट ६ कडील अंमलदार हे हडपसर भागात पुणे सासवड रोडवर जावुन बातमीतील वर्णनाच्या इसमाचा शोध घेत असताना,नमुद
बातमीतील वर्णनाचा इसम सासवड रोड रेल्वे स्टेशन जवळ, काळेपडळ, हडपसर येथे सार्वजनिक रोडवर उभा असलेला दिसला. त्यास त्याचे ताब्यातील मोटार सायकलसह ताब्यात घेऊन, त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव स्वप्नील नागनाथ व्हणमाने वय २३ रा. शिवतेजनगर काळेपडळ,
हडपसर, पुणे असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे त्याचे ताब्यातील मोटार सायकलचे मालकी हक्काबाबत कागदपत्रांची विचारपुस केली असता त्याने कोणतीही कागदपत्रे सादर केली
नसल्याने,सदरची मोटार सायकल चोरीची खात्री झाल्याने, त्यास सी. आर. पी. सी ४१ (१) (ड)प्रमाणे अटक केली आहे.
आरोपीकडे अधिक तपास करता, त्याचेकडुन १) हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं.५७/२०२४
भा.द.वि.क.३७९ २) हडपसर पो.स्टे गु.र.नं.१००/ २०२३, भा.दं.वि.कलम ३७९ ३) सिंहगड पो.स्टे
गु.र.नं.६५/२०२१,भा.दं.वि. कलम ३७९ ४) शिक्रापुर पो.स्टे गु.र.नं. ११५/२०२० भा.दं.वि.कलम ३७९
असे एकुण ०४ गुन्हे उघडकीस आणुन एकुण १,१५,०००/- रुपये किंमतीची वाहने जप्त केली आहेत.
त्याचेवर यापुर्वी हडपसर पो स्टे व सदर बाजार पो स्टे, सोलापुर याठिकाणी वाहन चोरीच गुन्हे दाखल आहेत. पुढील कार्यवाही कामी आरोपीतास हडपसर पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात
आले. सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, पुणे
शहर,श्री.रामनाथ पोकळे, मा. पोलीस उपआयुक्त, गुन्हे, पुणे, श्री. अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त,
गुन्हे-२,पुणे,श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-६ चे पोलीस निरीक्षक श्री.
उल्हास कदम, पोलीस अंमलदार, विठ्ठल खेडकर, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, प्रतिक लाहीगुडे,
ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, महेंद्र कडु, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली.