• January 18, 2024
  • No Comment

चारचाकी वाहनाची काच फोडून युवकास भररस्त्यात लुटणाऱया तडीपार आरोपीस अटक

चारचाकी वाहनाची काच फोडून युवकास भररस्त्यात लुटणाऱया तडीपार आरोपीस अटक

    लोणी काळभोर : (वार्ताहर दिगंबर जोगदंड): रात्रीचे जेवण उरकून मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या युवकाच्या गाडीची काच फोडून भररस्त्यात लुटल्याची घटना लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाजारमळा परिसरात बुधवारी (दि.१७) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तडीपार गुंडासह दोघांना अटक केली आहे.राजेश बाळासाहेब काळभोर (वय-३१, रा. बाजारमळा, लोणीकाळभोर, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर ऋषिकेश पवार व गौरव सोनवणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यात आणखीन दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश काळभोर यांचा वडीलापार्जित शेती व्यवसाय आहे. शेती व्यवसायावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु आहे. दरम्यान, काळभोर हे त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी चारचाकी गाडीतून बुधवारी (दि. १७) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास निघाले होते. बाजारमळ्याकडून लोणी गावाकडे जात असताना ओढ्याच्या अलीकडे अचानक गाडीच्या पाठीमागील काचेवर दगड मारल्याचा आवाज आला.त्यानंतर काळभोर यांनी गाडी थांबविली. त्यांनी गाडीच्या खाली उतरून पहिले असता, बुलेट मोटारसायकलवरती दोघेजण दिसून आले. तसेच त्यांच्या पाठीमागुन स्पेलंडर मोटारसायकलवरुन
    आणखी दोघेजण आले. बुलेट गाडीवर ऋषिकेश पवार
    व गौरव सोनवणे होते. या दोघांनी मिळून राजेश
    काळभोर यांना पकडले आणि पैसे काढुन दे, नाहीतर
    तुला खल्लास करुन टाकतो अशी धमकी दिली.
    काळभोर यांच्या खिशातील ऋषिकेश पवार याने तीन
    हजार काढुन घेतले व त्यांच्या गाडीच्या चारही बाजुच्या
    काचांवर दगड मारुन त्या फोडल्या. त्यानंतर चौघेजण
    दोन मोटारसायकलवरुन पळुन गेले. या घटनेतील आरोपी तडीपार गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. त्यामुळे सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणी काळभोर पोलिसांनी त्वरित आरोपी ऋषिकेश पवार व गौरव सोनवणे यांना अटक केली आहे. तर या गुन्ह्यातील अजून दोन अनोळखी आरोपींची नावे समजलेली नाहीत. त्या अनुषंगाने लोणी काळभोर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

     

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *