• January 6, 2023
  • No Comment

बेकायदा सावकारी प्रकरण,गुंड गजा मारणे टोळीतील गुंड पप्पू कुडलेच्या विरोधात गु्न्हा

बेकायदा सावकारी प्रकरण,गुंड गजा मारणे टोळीतील गुंड पप्पू कुडलेच्या विरोधात गु्न्हा

    पुणे : कोथरूड भागातील गुंड गजानन मारणे याचा निकटचा साथीदार पप्पू कुडले याने व्याजाने दिलेल्या पैशांवरून एकाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कुडले आणि साथीदारांच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियम, तसेच मारहाण करून धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.

    या प्रकरणी अतुल उर्फ पप्पू कुडले (रा. दत्तवाडी), बांदल, बालाजी उर्फ भैय्या कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संतोष विष्णू लिंबोळे (वय ३८, रा. ओमसाई अपार्टमेंट, जुनी सांगवी) याने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लिंबोळे याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फसवणुकीच्या गुन्ह्यात तो येरवडा कारागृहात होता. त्या वेळी त्याची मारणे टोळीतील गुंड पप्पू कुडले याच्याशी ओळख झाली होती. लिंबोळेला पैशांची गरज होती. त्याने कुडले याच्याकडून दहा लाख रुपये घेतले होते. त्यानंतर त्याने कुडले याला मुद्दल आणि व्याजासह एकवीस लाख रुपये परत केले होते.


    कुडले याने लिंबोळेकडे आणखी वीस लाख रुपये देण्याची मागणी केली होती. येरवड्यातील गुंजन टाॅकीज चौकात गुरुवारी  रात्री पावणेबाराच्या सुमारास कुडले आणि त्याच्या साथीदारांनी लिंबोळेला बोलावून घेतले. लिंबोळे, त्याचे मित्र विशाल धुमाळ, कृष्णा अगरवाल आणि गौतम खुराणा यांना कुडलेने धमकावून त्याच्या मोटारीत बसवले. लिंबोळेला धमकावून ८२ हजार रुपये कुडलेने घेतले. त्यानंतर लिंबोळे आणि मित्राला मोटारीतून उतरण्यास सांगण्यात आले. ‘तू जर मला व्याजाचे पैसे दिले नाही तर आम्ही तुझा हात कापून टाकू,’ अशी धमकी देऊन कुडले पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक भगवान गुरव या प्रकरणाचा तपास करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *