• January 6, 2023
  • No Comment

पुणे कॅम्प परिसरात कोयता गँगची दहशत

पुणे कॅम्प परिसरात कोयता गँगची दहशत

    कॅन्टोन्मेंट : तोंडाला रुमाल, डोक्यात टोपी घालून दुचाकी आलेल्या पाचजणांनी कोयता, रॉड घेऊन हॉटेलमालकाला शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. तुमची हिंदुंची हॉटेल चालविण्याची लायकी आहे का, असे म्हणत हॉटेलची तोडफोड करणाऱ्यावर लष्कर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    हा प्रकार भवानी पेठेतील निशा हॉटेलमध्ये गुरुवारी (दि. ५ जानेवारी, २०२३) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी मोनिश शशिकांत म्हेत्रे (वय ३९, रा. ३८८, भवानी पेठ, पुणे) यांनी लष्कर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.


    पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीला पाच अज्ञातांनी भवानी पेठेतील निशा हॉटेलमध्ये घुसून तोडफोड केली, त्यानंतर कोयता, लोखंडी ऱॉडचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे पुढील तपास करीत आहेत.हॉटेलचे मालक शैलेश म्हेत्रे हे भाजपचे कार्यकर्ते आहे. म्हेत्रे म्हणाले की, निवडणुका जवळ येत आहे. माझ्या विरोधकांनी हा कट रचून हा प्रकार केला असल्याची माहिती त्यांनी दिली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *