• January 6, 2023
  • No Comment

कोयते घेऊन दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश

कोयते घेऊन  दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश

    पुणे – शहरात गेल्या काही दिवसांत कोयते घेऊन दहशत माजविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत.कोयता गॅंगसह इतर काही गुन्हेगारांकडून कोयते घेऊन शहरात दहशत माजवीत असल्याच्या घटना घडत आहेत.

    अशा घटना रोखण्यासाठी पोलिस काय उपाययोजना करीत आहेत, या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर पोलिस आयुक्त रितेश कुमार म्हणाले, ‘शहरातील वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि पोलिस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक यांची बैठक शुक्रवारी घेण्यात आली. या बैठकीत कोयते घेऊन दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाईचे आदेश सर्व पोलिस ठाण्यांना दिले आहेत. पोलिसांनी व्यूहरचना आखली असून, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) आणि झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एम.पी.डी.ए.) नुसार कारवाई सुरू आहे.’

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *