• October 22, 2023
  • No Comment

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वारील दोन तरुणांचा मृत्यू

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वारील दोन तरुणांचा मृत्यू

पुणे: पुणे सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर परिसरात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वारील दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्री घडली. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश विठ्ठल हवालदार (वय २६), आदित्य हरिदास साठे (वय २६, रा. दोघे रा. महादेवनगर, हडपसर) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास गणेश आणि आदित्य पुणे-सोलापूर महामार्गावरुन हडपसरकडे निघाले होते. कदमवाक वस्ती परिसरात भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार गणेश आणि सहप्रवासी आदित्य गंभीर जखमी झाले
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या गणेश आणि आदित्य यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. पसार झालेल्या ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्या शोध घेण्यात येत आहे

Related post

चरस, गांजाची विक्री करणारा टोळका जेरबंद, अंमली पदार्थ विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी, चव्वेचाळीस लाखाचा माल हस्तगत

चरस, गांजाची विक्री करणारा टोळका जेरबंद, अंमली पदार्थ विरोधी…

पुणे : कात्रज परिसरातून चरस, गांजाचा मोठा साठा जप्त; अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी आलेल्या अरुण अरोराकडून 44 लाखाचा माल हस्तगत कात्रज: अंमली…
फरार अट्टल गुन्हेगार व त्याच्या साथीदारांवर मोक्का कारवाई,वारजे माळवाडी पोलिसांची लोणावळ्यात कारवाई

फरार अट्टल गुन्हेगार व त्याच्या साथीदारांवर मोक्का कारवाई,वारजे माळवाडी…

वारजे: जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी सह साथीदारांवर मोक्का कारवाई केली. त्यातून तो जामीनावर सुटल्यानंतरही त्याची गुन्हेगारी थांबत…
पिंपरी-चिंचवडमध्ये कंपनीला भीषण आग; आगीचे कारण अजुन अस्पष्ट

पिंपरी-चिंचवडमध्ये कंपनीला भीषण आग; आगीचे कारण अजुन अस्पष्ट

भोसरी: पिंपरी-चिंचवडच्या भोसरी एमआयडीसी परिसरात प्लास्टिक आणि रबर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली आहे. संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशमन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *