• October 22, 2023
  • No Comment

अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या साथीदारास पुणे पोलिसांनी केली अटक

अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या साथीदारास पुणे पोलिसांनी  केली अटक

    पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या साथीदारास पुणे पोलिसांनी अटक केली. ललितच्या नाशिकमधील मेफेड्रोन निर्मितीचा कारखाना, तसेच अमली पदार्थ विक्रीची जबाबदारी आरोपीकडे सोपविण्यात आली होती, अशी माहिती प्राथमिक तपासात पोलिसांना मिळाली आहे.

    रोहन उर्फ गोलू अन्सारी असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. मुंबई पोलिसांनी अन्सारीला ठाणे परिसरातून अटक केली होती. बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अन्सारी सहआरोपी आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या अन्सारीचा ताबा पुणे पोलिसांनी घेतला. नाशिकमधील औद्योगिक वसाहतीत ललित आणि त्याचा भाऊ भूषण यांना मेफेड्रोन निर्मितीचा कारखाना सुरूकेला होता. आरोपी अन्सारी अमली पदार्थ विक्रीतून मिळणारे पैसे ललित आणि भूषणकडे देत होता. नाशिकमधील मेफेड्रोन निर्मितीच्या कारखान्याची जबाबदारी अन्सारीकडे सोपविण्यात आली होती
    अन्सारीला शनिवारी (२१ ऑक्टोबर) न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अन्सारीची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. अमली पदार्थ तस्कर ललित पाटील आणि अभियंता अरविंदकुमार लोहारे यांना चाकण परिसरात मेफेड्रोन बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. येरवडा कारागृहात लोहारेने मेफेड्रोन या अमली पदार्थ निर्मितीची माहिती कारागृहात ललितला दिली. ही माहिती घेऊन ललित व त्याचा भाऊ भूषणने नाशिकमध्ये मेफेड्रोन निर्मितीचा कारखाना सुरू केला होता, अशी माहिती तपासात उघड झाली आहे

    ललितला मुंबई पोलिसांनी अटक केली असून, सध्या तो पोलीस कोठडीत आहे. साकीनाका पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ललितला पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करायची आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात ललितविरुद्ध मेफेड्रोन बाळगणे, तसेच रुग्णालयातून पसार झाल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. ललितचा भाऊ भूषण आणि साथीदार अभिषेक बलकवडे यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *