• October 22, 2023
  • No Comment

किराणा माल विक्रेत्याने खंडणी न दिल्याने दुकानाची तोडफोड करुन पसार झालेले आरोपींना अटक

किराणा माल विक्रेत्याने खंडणी न दिल्याने दुकानाची तोडफोड करुन पसार झालेले आरोपींना अटक

    पुणे: कात्रज भागात एका किराणा माल विक्रेत्याने खंडणी न दिल्याने दुकानाची तोडफोड करुन पसार झालेले आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. पसार झालेले आरोपी दांडिया खेळण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून पकडले.

    विनोद बालाजी सोमवंशी (वय २०, रा. दत्तनगर, कात्रज), गोविंद बबन लोखंडे (वय १८, रा. शनीनगर, कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. विनोद सोमवंशीने साथीदार भूषण भांडवलकर, जावेद शेख यांना एका किराणा माल दुकानदाराकडून खंडणी घेण्यास सांगितले होते. किराणा माल विक्रेत्याने खंडणी देण्यास नकार दिल्याने सोमवंशी चिडला. त्यानंतर सोमवंशी आणि साथीदार किराणा माल दुकानात शिरले. दुकानाची तोडफोड करुन जीवे मारण्याची धमकी दिली. किराणा माल विक्रेत्याचा पुतण्या आणि मेहुण्याला मारहाण केली. या भागातील वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविली
    घाबरलेल्या दुकानदाराने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी पसार झालेल्या सोमवंशी आणि साथीदारांचा शोध सुरू केला. सोमवंशी आणि साथीदार लोखंडे कात्रज-कोंढवा रस्त्यावरील नवरात्रोत्सवात दांडिया खेळण्यासाठी येणार असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस कर्मचारी हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांना मिळाली. सापळा लावून दोघांना पोलिसांनी पकडले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहायक निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक धीरज गुप्ता, मोहन कळमकर, हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, सचिन सरपाले आदींनी ही कारवाई केली

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *