• October 13, 2023
  • No Comment

मुंबई येथून पिंपरी-चिंचवड शहरात विक्रीसाठी मॅफेड्राॅन आणले; ‘अंमली’ विरोधी पथकाने पकडले, ११६ ग्रॅम ड्रग्ज जप्त

मुंबई येथून पिंपरी-चिंचवड शहरात विक्रीसाठी मॅफेड्राॅन आणले; ‘अंमली’ विरोधी पथकाने पकडले, ११६ ग्रॅम ड्रग्ज जप्त

    पिंपरी : मुंबई येथून पिंपरी-चिंचवड शहरात विक्रीसाठी मेफेड्राॅन (एमडी) आणले. मात्र, पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने चिखली येथे कारवाई करत दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ११६ ग्रॅम मेफेड्रॉन ड्रग्ज जप्त केले. ही कारवाई मंगळवारी (दि. १०) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास केली.

    रामकुमार रामसजीवन मिश्रा (४५, रा. नालासोपारा, पालघर. मूळ रा. उत्तर प्रदेश), अब्दुल मुशरफअली कलीम उर्फ सिद्दिकी (३५, रा. कुदळवाडी, चिखली. मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस अंमलदार प्रसाद जंगीलवाड यांनी बुधवारी (दि. ११) चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधववाडी-कुदळवाडी रस्त्यावर वडाचामळा येथे दोघेजण संशयितपणे थांबले असून त्यांच्याकडे अंमली पदार्थ असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून रामकुमार आणि अब्दुल या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता मेफेड्रॉन ड्रग्ज विक्रीसाठी आणले असल्याचे त्यांनी सांगितले. दोघांकडे ११६ ग्रॅम मेफेड्रॉन ड्रग्ज आढळून आले. ड्रग्ज, दोन दुचाकी, रोख रक्कम, दोन मोबाईल फोन असा एकूण १३ लाख ३५ हजार ५९० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. संशयितानी हे ड्रग्ज गोरेगाव मुंबई येथून महंमद शकील उर्फ गुप्ता (रा. भगतसिंगनगर, गोरेगाव, मुंबई) याच्याकडून आणला असल्याचे सांगितले. त्यामुळे महंमद शकील उर्फ गुप्ता याच्या विरोधात देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *