- March 7, 2024
- No Comment
कोकणात विक्रीसाठी पाठविण्यासाठी शहरात आणलेला सुमारे ४५ हजार रुपये किमतीचा साडेचार किलो गांजा भोर पोलिसांनी पकडला
कोकणात विक्रीसाठी पाठविण्यासाठी शहरात आणलेला सुमारे ४५ हजार रुपये किमतीचा साडेचार किलो गांजा भोर पोलिसांनी पकडला असून वाहतूक करणा-या तरुणाला अटक केली आहे.
अजय किसन गुमाने (वय २१, रा. अनंतनगर झोपडपट्टी, भोर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असून मंगळवारी (ता.५) रात्री सव्वाआठ वाजता शहरातील महाडनाका परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली. याबाबत भोर पोलिसांनी दिलेली माहिती अशी कोकणात विक्रीसाठी गांजा पाठविण्यात येणार असल्याची गुप्त खबर पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी महाड नाका परिसरात पाळत ठेवली. रात्री सव्वाआठच्या सुमारास महाड नाक्यावरील महाडला जाणा-या रस्त्याच्या डाव्या बाजूला संजयनगर कडे जाणा-या फाट्याजवळील अर्धवट बांधकाम सुरू असलेल्या इमारतीसमोर अजय गुमाणे आढळला. त्याच्याजवळील पोत्यात साडेचार किलो उग्र वास असलेला गांजा आढळून आला पोलिसांनी त्यास गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.